शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात सोने देण्याचे आमिष; युवकाला गंडा

By admin | Updated: March 31, 2015 00:41 IST

वाळूज महानगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून युवकाला दोन हजारांना गंडा घालणाऱ्या सासू व तिच्या सुनेला रविवारी वाळूज पोलिसांनी अटक केली

वाळूज महानगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून युवकाला दोन हजारांना गंडा घालणाऱ्या सासू व तिच्या सुनेला रविवारी वाळूज पोलिसांनी अटक केली. या महिलांच्या ताब्यातून ४ तोळ्याचे नकली सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.विजय दिलीप गुरव हे मार्केटिंग प्रतिनिधी असून, रेल्वेमध्ये विविध वस्तू प्रवाशांना विकून उदरनिर्वाह करतात. महिनाभरापूर्वी रेल्वे प्रवासात त्यांची दोन महिलांबरोबर ओळख झाली होती. या महिलांनी स्वस्तात सोने देण्याची थाप मारली होती. सध्या पैसे नाहीत, असे सांगितल्यावर विजयचा मोबाईल क्रमांक त्यांनी घेतला. काही दिवसांनी या महिलांनी विजयच्या मोबाईल क्रमांकावर सतत संपर्क साधून स्वस्तात सोने देऊ म्हणून त्याला वाळूजला येण्याची गळघातली.२९ मार्चला दुपारी विजय वाळूजला आला. या महिलांनी त्याला बाजारतळाजवळ बोलावून आपल्याकडे असलेले सोन्याचे दागिने दाखविले. सोने खरे असल्याचे भासविण्यासाठी या महिलांनी दोन खऱ्या सोन्याचे मणी विजयलादिले. सध्या फक्त दोन हजार रुपये असल्याचे विजयने सांगताच बाकीचे पैसे नंतर दे, असे म्हणून त्यांच्याजवळील दोन हजार रुपये घेऊन त्यास गंठण व सोन्याचे कडे देऊन निघून गेल्या. दरम्यान, या वस्तू नकली सोन्याच्या असल्याचे लक्षात येताच विजयने तात्काळ वाळूज पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागरसिंग राजपूत, पोकॉ. विद्या जाधव, पोकॉ. जाधव यांनी विजयला सोबत घेऊन महिलांचा शोध सुरू केला.