शैक्षणिक साहित्यातून बदलणार शाळांचा ‘लूक’

By Admin | Updated: December 23, 2015 23:55 IST2015-12-23T23:05:14+5:302015-12-23T23:55:52+5:30

बीड : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांच्या चाकोरीत न घडविता त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी ज्ञानरचनावादी शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

'Look' for schools to be replaced by educational material | शैक्षणिक साहित्यातून बदलणार शाळांचा ‘लूक’

शैक्षणिक साहित्यातून बदलणार शाळांचा ‘लूक’


बीड : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांच्या चाकोरीत न घडविता त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी ज्ञानरचनावादी शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या कल्पनेतून विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती केली जाणार आहे. यामुळे शाळांना शैक्षणिक वातावरणाचा ‘लूक’ मिळणार आहे.
विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा व चिकित्सावृत्ती वाढीस लागण्यास मदत व्हावी, यासाठी २२ जून २०१५ रोजी शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाची घोषणा केली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी अध्यापनात अडकवून न ठेवता त्यांना व्यवहारज्ञान व समाजभान मिळावे यासाठी रचनात्मक शिक्षण पद्धती पुढे आली. विद्यार्थी केवळ अभ्यासू असून चालणार नाही तर तो सर्व कसोट्यांवर उतरला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून आता शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्याबरोबरच नवनवीन बाबी आत्मसात केल्या पाहिजेत. त्यासाठी विज्ञान, गणित व भाषाविषयक अभ्यासक्रमांमधील साहित्याची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. टाकाऊपासून टिकावू, रंगांमधून विविध चित्रे, भिंतींची रंगरंगोटी आदी कलाविष्कार साकारण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. याकरता शिक्षणप्रेमी नागरिकांसह कलावंतांचीही मदत घेणार आहे.
तीन दिवस कार्यशाळा
शैक्षणिक साहित्य निर्मितीबाबत शिक्षकांसाठी बुधवारपासून तीन दिवसीय कार्यशाळांना सुरुवात झाली आहे. सलग सुट्यांमध्येच ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Look' for schools to be replaced by educational material