शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाला ठोकले कुलूप

By admin | Updated: June 14, 2016 23:52 IST

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश मिळालेली शाळाच जागेवर नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या संतप्त पालकांनी चक्क जि.प. शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजालाच बाहेरून कुलूप ठोकले.

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश मिळालेली शाळाच जागेवर नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या संतप्त पालकांनी चक्क जि.प. शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजालाच बाहेरून कुलूप ठोकले. त्यामुळे उपशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील सर्वच कर्मचारी जवळपास पाऊण तास आतमध्ये अडकले. ही घटना आज मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान, यासंबंधीची माहिती मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी मोबाईलवरून क्रांतीचौक पोलिसांना कळवली. त्यानंतर तात्काळ पोलिसांचा मोठा ताफा जिल्हा परिषदेत पोहोचला. त्यावेळी शिक्षण विभागाबाहेर कुलूप ठोकणाऱ्या पालकांसह बघ्यांची मोठी गर्दी जमलेली होती. पोलिसांनी कुलूप उघडण्याचे फर्मान सोडल्यानंतर तेव्हा कुठे चार वाजेच्या सुमारास त्या पालकांनी कुलूप उघडले. काही अवधीनंतर शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल तेथे पोहोचले. त्यांनी शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी - अधिकाऱ्यांना सोबत घेऊन क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले व संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली. प्राप्त माहितीनुसार उदय सोनवणे व रवी गायकवाड यांच्यासह काही पालक सकाळपासूनच जिल्हा परिषदेत आले होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी मोगल यांच्या दालनात जाऊन पालकांनी ‘आरटीई’ अंतर्गत शाळांनी शिक्षण विभागाबरोबरच पालकांचीही दिशाभूल केली आहे, अशा शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी, असा आग्रह धरला. यामध्ये नारेगावच्या एका शाळेचा उल्लेख उदय सोनवणे व गायकवाड यांनी केला. शाळा नोंदणीच्या वेळी नारेगाव येथे शाळा असल्याची नोंद केली; पण जेव्हा २५ टक्के प्रवेशाची यादी जाहीर झाली. यादीत नावे जाहीर झालेल्या पालकांनी प्रवेशासाठी नारेगाव येथे त्या शाळेचा शोध घेतला; पण ती शाळा कुठेही आढळून आली नाही. प्रत्यक्षात ती शाळा अनधिकृतपणे पिसादेवी येथे सुरू आहे. त्या शाळेविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, असा आग्रह धरत पालकांनी शिक्षणाधिकारी मोगल यांना अरेरावी केली. त्यामुळे मोगल हे दालनातून निघून गेले होते. त्यानंतरही ते पालक शिक्षण विभागाबाहेरच थांबून मोगल यांची प्रतीक्षा करत थांबले होते. शेवटी त्यांनी शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजालाच बाहेरून कुलूप ठोकले. बाहेरच्यांची दादागिरीशिक्षणाधिकारी आर. एस. मोगल हे सहकाऱ्यांसोबत क्रांतीचौक ठाण्यात गेले आणि त्यांनी आजच्या प्रकरणात उदय सोनवणे,विलास गायकवाड,अरुण निकाळजे,शुक्लोधन जाधव,दीपक कणसे, रवी जाधव आणि रवी गायकवाड या सातजणांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या सातही जणांना ताब्यात घेतले आहे. बाहेरचे लोक येऊन शिक्षण विभागात नेहमीच वेठीस धरत आहेत, अशा असामाजिक तत्त्वांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणीही मोगल यांनी पोलिसांकडे केली आहे.