शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविक नाथचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:15 IST

नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान बुधवारी ५ लाखांवर भाविक व वारकºयांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान बुधवारी ५ लाखांवर भाविक व वारकºयांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्रभरातून ५३७ दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्याची नोंद न.प.कडे झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वारकºयांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले. यंदा दिंडीसोबत वारकºयांची संख्या कमी असली तरी वाहनाने येणाºया वारकºयांच्या संख्येत मोठी वाढ झाली.
बोंडअळी व गारपिटीमुळे यंदा भाविकांची संख्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता; परंतु नाथांवर असलेली अपार श्रद्धा वारकºयांना रोखू शकली नाही. षष्ठीपूर्व नगर परिषदेच्या वतीने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केल्याने व शहरात दाखल होणाºया रस्त्यांची कामे झाल्याने वारकºयांना सुटसुटीत रस्ते उपलब्ध झाले व वाहतूकही जाम झाली नाही.
स्वयंसेवी संस्थांचे कार्य
वारकरी व भाविकांना सेवा व सुविधा पुरवून प्रशासनास मदत होईल, असे महत्त्वपूर्ण काम विविध स्वयंसेवी संस्था करीत आहेत, त्यात मंदिर परिसरात दर्शन व्यवस्थेत सहकार्य करण्यासाठी ३२५ स्वयंसेवकांसह अनिरुद्ध अकॅडमी, यांच्यासह रामकृष्ण मिशन आश्रमचा मेडिकल कँप, स्वकाम सेवा मंडळाची स्वच्छता, जय बजरंग संघ, सावन कृपाल रुहानी मिशन, ज्येष्ठ नागरिक संघ, पाथर्डी, संत एकनाथ सेवा संघ, रेड स्वस्तिक व शांतिब्रह्म संत एकनाथ वारकरी सेवा प्रतिष्ठान यांचा समावेश आहे.

धरणाच्या पिचिंगवर वारकरी
नाथषष्ठीसाठी पैठणनगरीत आलेल्या वारकºयांनी स्नानासाठी आज पहाटेपासून थेट जायकवाडी धरणाकडे मोर्चा वळवला व लाखो भाविकांनी धरणाच्या काठावर बसून गोदावरीच्या पवित्र स्नानाचे पुण्य प्राप्त केले.
च्जायकवाडी धरणाकडे जाणारा उद्यान रोड आज पहाटेपासून खचाखच भरलेला होता. लाखोंच्या संख्येने वारकरी स्नानासाठी या मार्गाने जात असल्याने अनेक वेळा हा मार्ग जाम होत होता. धरणाच्या पिचिंगवर दगडाऐवजी वारकरी दिसत होते. वारकºयांच्या उपस्थितीने जायकवाडीचा काठ फुलून गेला होता. पहाटे-पहाटे धरणाच्या काठावरून होणारा ‘भानदास एकनाथ’चा जयघोष मनाला प्रफुल्लित करून जात होता.
धरणावर पोहणाºया तरुणांचे सुरक्षा पथक
जायकवाडी धरणावर दुर्घटना होऊ नये म्हणून नगर परिषदेतर्फे अंतराअंतराने पोहणाºया तरुणांचे बचाव पथक तैनात करण्यात आले होते. पहाटे नगराध्यक्ष सूरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड, सतीश पल्लोड, दिलीप मगर, सुनील रासणे, व्यंकटी पापूलवार आदींनी जायकवाडी धरणावर जाऊन सुरक्षा पथकास काळजी घेण्याबाबत सूचना केल्या.
विजयी पांडुरंगास अभिषेक
आज फाल्गुन वद्य षष्ठी असल्याने पहाटे गावातील नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान व अभिषेक नाथवंशजांच्या वतीने घालण्यात आले व विधिवत पूजा करून पुन्हा स्थानापन्न करण्यात आले. त्याचवेळी बाहेरील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीची सुद्धा विधिवत पूजा करण्यात आली.
गोदापात्रात सोडले पाणी
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशान्वये नाथषष्ठीनिमित्त वारकरी व भाविकांना स्नानासाठी जायकवाडी धरणातून बुधवारी गोदापात्रात १०० क्युसेक्स दराने पाणी सोडण्यात आले. तीन दिवस पाण्याचा विसर्ग चालू राहणार असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
विश्वशांतीसाठी अनोखे पसायदान
नाथषष्ठीनिमित्त ७ मार्च रोजी महाराष्ट्रातील पहिलाच आगळावेगळा विश्वशांती प्रार्थना संदेश पसायदान उपक्रम येथे लाखो वारकरी व भक्तांनी राबविला. जवळ्पास ५५० दिंड्यांमधून एकाचवेळी भक्तीमय वातावरणात पसायदान गाऊन जगाला विश्वशांतीचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमाचे संत -महंत व वारकºयांनी स्वागत करुन महाराष्ट्रात भरणाºया यात्रेत हा संदेश राबविला जाईल, असा निर्धार वारकरी संघटनेने जाहीर केला.
या उपक्रमाचे मुख्य संयोजक प्रा. चंद्रकांत भराट, आ. संदीपान भुमरे, ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गीता मंदिरसमोरील माऊली संस्थान फडावर लाखोच्या जनसमुदायाने ठरल्याप्रमाणे दुपारी अडीच वाजता विश्वशांतीसाठी एकाचवेळी प्रार्थना केली. या कार्यक्रमास ह.भ.प. चंद्रकांत महाराज बांडे, कल्याण महाराज तांबे, कल्याण वीर, बाळू महाराज, काशिनाथ महाराज माने, विठ्ठल महाराज संपाते, दादा बारे, सोमनाथ टाक, चव्हाण, नीलेश देशमुख, गोरडे, सुमित औटे, विवेक दौंड आदी उपस्थित होते.