करबुडव्यांनी महापालिकेला घुमविले

By Admin | Updated: August 13, 2014 01:43 IST2014-08-13T01:29:01+5:302014-08-13T01:43:25+5:30

औरंगाबाद : शहरातील ३६३ महाठकांनी पालिकेला बँक खात्यात रक्कम नसताना मालमत्ता करापोटी धनादेश देऊन घुमविल्याची माहिती पुढे आली आहे.

The Karauddhas have turned the Municipal corporation | करबुडव्यांनी महापालिकेला घुमविले

करबुडव्यांनी महापालिकेला घुमविले

औरंगाबाद : शहरातील ३६३ महाठकांनी पालिकेला बँक खात्यात रक्कम नसताना मालमत्ता करापोटी धनादेश देऊन घुमविल्याची माहिती पुढे आली आहे. या करबुडव्यांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी १६ आॅगस्टपर्यंत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
३१ मार्च २०१४ पर्यंत मनपाने मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीतून जवळपास ९५ कोटी रुपयांचा कर मिळविला. या मोहिमेत ५० टक्के कर धनादेशातून जमा झालेला आहे. त्यातील १ कोटी रुपयांचे धनादेश बँकेत रक्कम नसल्यामुळे बाऊन्स झाले. १ एप्रिलपासून आजवर पाच महिन्यांत मनपाने वारंवार नोटिसा देऊन संबंधित करदात्यांनी पालिकेला कर दिला नाही. मालमत्ता सील करण्याची तंबी दिल्यानंतर काही मालमत्ताधारकांनी कर दिला. त्यातून पालिकेला ५० लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळाले. अजून ५० लाख रुपयांचे न वटलेले धनादेश पालिकेत पडून आहेत. ते न वटल्यास १६ पासून मालमत्ता सील करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. असे करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले.
प्रभागनिहाय बाऊन्स धनादेश
प्रभागधनादेशवटलेबाकी
अ१८0३१५
ब७५६५१०
क३०२१0९
ड६६१३५३
ई६७४९२३
फ१०७७७३०
एकूण३६३२२८१४०
२२८ धनादेश वटले
सहा प्रभागांपैकी २२८ धनादेश वटले असून पालिकेला ५० लाखांचा कर मिळाल्याचा दावा करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी केला.
१४० धनादेश बाऊन्स झालेले आहेत. फ प्रभागात सर्वाधिक १०७ धनादेश बाऊन्स झाले होते. धनादेश १६ तारखेपर्यंत वटले नाही तर संबंधितांच्या मालमत्ता सील करण्याचा इशारा झनझन यांनी दिला.

Web Title: The Karauddhas have turned the Municipal corporation