शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

कन्हेरवाडीची ‘सिंगल फेज’ योजना नावालाच

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

परळी: शहरापासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी गावात ‘सिंगल फेज’ योजनेच्या ८ डीपी उभ्या केल्या. मात्र अद्यापही या सिंगल फेज योजनेच्या डीपीवरुन कनेक्शन सुरू केलेले नाही

परळी: शहरापासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी गावात ‘सिंगल फेज’ योजनेच्या ८ डीपी उभ्या केल्या. मात्र अद्यापही या सिंगल फेज योजनेच्या डीपीवरुन कनेक्शन सुरू केलेले नाही. मागील चार वर्षांपासून ही योजना मंजूर झालेली असूनही अद्याप कार्यान्वित नाही. त्यामुळे ही योजना केवळ नावालाच आहे, की काय? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.परळी-अंबाजोगाई राज्य रस्त्यावर असलेल्या कन्हेरवाडी येथे बारा हजार लोकसंख्या आहे. या गावात ४ वर्षांपूर्वी सिंगल फेज योजनेंतर्गत विद्युत खांब व डीपी बसविण्यात आल्या आहेत. मात्र यावरुन अद्यापही वीजपुरवठा सुरू केलेला नाही. त्यामुळे सकाळी ४ ते ११ व दुपारी ४ ते ९.३० या दरम्यान वीजपुरवठा खंडित असतो. ही योजना कार्यान्वित न झाल्याने अनेक अडचणींचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागतो. भारनियमनाने वैतागलेल्या ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनाद्वारे आपली तक्रार केली. लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा एच.यू. फड, विकास मुंडे, समाधान मुंडे, विष्णू फड, बालासाहेब फड यांनी दिला आहे.योजना का सुरू नाही?जिरेवाडी व कन्हेरवाडीला सिंगल फेज योजना सुरु का केली जात नाही? कन्हेरवाडीला अंधारात का ठेवले जाते? किती दिवस येथील ग्रामस्थांनी अंधाराचा सामना करायचा? विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण ? यासारखे अनेक प्रश्न सामाजिक कार्यकर्ते एच.यू. फड यांनी उपस्थित केले आहेत. ही योजना सुरू न करण्यात अधिकारी, कर्मचारी यांचाही समावेश आहे, असा आरोप फड यांनी केला असून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत शाखा अभियंता भालचंद्र चाटे म्हणाले, कन्हेरवाडी सिंगल फेज योजनेंतर्गत जिरेवाडी गावाचाही समावेश आहे. जिरेवाडीत डीपी बसविल्यास जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही सिंगल फेज योजना कार्यान्वित होत नाही, असे सांगितले.जिरेवाडी ग्रामस्थांचा डीपीसाठी विरोध नाहीशाखा अभियंता चाटे म्हणाले होते, जिरेवाडी गावात सिंगल फेजसाठी डीपी बसविण्यास जागा उपलब्ध नाही. मात्र जिरेवाडी ग्रामस्थांचा डीपीसाठी कुठलाही विरोध नाही. येथील ग्रामस्थांनाही बारा तास भारनियमनाचा सामना करावा लागतो. या योजनेला आमचा विरोध नसल्याचे जिरेवाडीचे माजी सरपंच तुकाराम मुंडे यांनी सांगितले.भारनियमनाला नागरिक वैतागलेसकाळी ७ व सायंकाळी ५ तास भारनियमन केले जात असल्याने या भारनियमनाला ग्रामस्थ वैतागले आहेत. ज्या वेळेत वीज आहे अशा वेळेतही वीज गुल होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर ही योजना सुरू करुन ग्रामस्थांचे हाल थांबवावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)