शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

उठबशा प्रकरणाचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर!

By admin | Updated: August 12, 2015 00:54 IST

जालना: जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या जालन्यातील उठबशा प्रकरणाचा तपास पूर्ण करून अहवाल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक

जालना: जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या जालन्यातील उठबशा प्रकरणाचा तपास पूर्ण करून अहवाल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती चौकशी अधिकारी अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी दिली.येथील नूतनवसाहत भागातील रेल्वे उड्डाणपुलाखाली अतिक्रमण करून स्थापन केलेल्या हनुमान मूर्ती हटविताना तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी व्हिडिओ शुटींग घेतली होती. त्यातील चित्रिकरणाच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम व त्यांच्या पथकाने सरस्वती कॉलनी येथील सतीश गुलाब वाघ ( वय ३० ) व ओमप्रकाश आढे या दोन तरुणांना ३०० उठबशा काढण्याची शिक्षा देवून त्यांना मारहाणही करण्यात आली होती. त्याचा या दोन्ही युवकांच्या मूत्रपिंडावर परिणाम झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या संबंधी सर्वप्रथम लोकमत ने करण्यात १४ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताने राज्यभर पोलिस प्रशासना विरोधात रोष व्यक्त झाल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी नांदेड दौऱ्यात असताना या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे सोपविली होती.दरम्यानच्या काळात औरंगाबाद पोलिसांनीही संबंधित डॉक्टरांचा एमएलसी अहवालावरून वाघ व आढे या तरूणांचा जबाब नोंदवून अहवाल कारवाईसाठी कदीम जालना पोलिसांकडे पाठविला. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने तो अहवाल कदीम जालना पोलिसांनी अप्पर पोलीस अधीक्षक माकणीकर यांच्याकडे पाठविला होता. या अहवालानुसार कदीम जालना पोलिसांनीही पिडित तरुणांचे जबाब नोंदविले होते. तसेच चौकशी अन्य काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ही जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणाची सर्व चौकशी पूर्ण करून अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांना पाठविण्यात आला. (प्रतिनिधी)