शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अधिकारीच गोत्यात!

By admin | Updated: May 23, 2016 05:14 IST

बाळगंगा सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी करीत असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी सुनील कलगूटकर यांच्याविरुद्ध पाटबंधारे विभागातील अभियंत्याने गंभीर तक्रार केली

डिप्पी वांकाणी, मुंबई बाळगंगा सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी करीत असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी सुनील कलगूटकर यांच्याविरुद्ध पाटबंधारे विभागातील अभियंत्याने गंभीर तक्रार केली असून, या तक्रारीची दखल घेत त्यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. शिवाय, या प्रकरणात आपल्याच अधिकाऱ्याविरुद्ध प्रतिकूल अहवाल द्यावा लागल्याने एसीबीवरही नामुश्की ओढावली आहे. बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेची चौकशी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक कलगूटकर करत आहेत. हा तपास सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे खात्यातील कार्यकारी अभियंता सुभाष झगडे यांनी गेल्या ५ फेब्रुवारी रोजी मानवी हक्क आयोगाकडे कलगूटकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. कलगूटकर यांनी माझे अपहरण केले व रायगडमध्ये धरणासाठी पाहणीचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराला धनादेश (चेक्स) देण्यासाठी मला भाग पाडले, असे तक्रारीत म्हटले आहे.अभियंता झगडे यांच्या तक्रारीची दखल घेत मानवी हक्क आयोगाने एसीबीला चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षक दत्ता कराळे यांनी नुकताच आपला चौकशी अहवाल सादर केला असून, त्यात कलगूटकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. एसीबीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या माहितीस दुजोरा दिला. मात्र, चौकशी अधिकारी झगडे यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.