खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): खुलताबाद शहरात एका विवाहितेच्या कौटुंबिक छळाचा आणि अत्याचाराचा भीषण प्रकार समोर आला आहे. २३ वर्षीय पीडित तरूणीने मंगळवारी (दि. १४) दिलेल्या तक्रारीनुसार, सासऱ्याने गेल्या वर्षभरापासून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या गुन्ह्यात पीडितेचा पती यालाही सहआरोपी करण्यात आले असून, त्याने आपल्या वडिलांच्या या दुष्कृत्याला विरोध करण्याऐवजी पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप आहे.
पती आणि सासूचे संशयास्पद वर्तनपीडितेने सुरुवातीला हा प्रकार सासूला सांगितला, मात्र तिने प्रकरण दडपून ठेवले. जेव्हा पीडितेने पतीला सर्व हकीकत सांगितली, तेव्हा त्याने "वडील तुझी काळजी घेत आहेत, त्यांनी असे केले तर काय झाले?" असे म्हणत क्रूरतेचा कळस गाठला. पुढे पतीने तिला वाऱ्यावर सोडून दिले आणि तो दुसऱ्या महिलेसोबत राहण्यासाठी निघून गेला.
अत्याचाराची मालिका आणि अखेर तक्रारपती गेल्यानंतरही सासरा रात्रीच्या वेळी पीडितेवर अत्याचार करत होता. या काळात पीडितेने एका मुलीला जन्म दिला. सामाजिक बदनामीच्या भीतीने तिने हा छळ सोसला, मात्र १५ दिवसांपूर्वी माहेरी गेल्यानंतर तिने आपल्या आई-भावाकडे धाडसाने सर्व प्रकार सांगितला. १४ एप्रिल रोजी सासरा तिला नेण्यासाठी माहेरी आला असता सर्व प्रकार उघड झाला आणि पीडितेने पोलीस ठाणे गाठले.
पोलीस कारवाईखुलताबाद पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी असलेला पती सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Web Summary : A woman in Khultabad was sexually assaulted by her father-in-law for a year. Her husband condoned the abuse, even after she confided in him. The father-in-law is arrested; the husband is on the run.
Web Summary : खुलताबाद में एक महिला के साथ उसके ससुर ने एक साल तक यौन उत्पीड़न किया। महिला के पति ने भी इस दुर्व्यवहार को सही ठहराया। ससुर गिरफ्तार, पति फरार है।