शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! खंडणी वसूल करून दारू पिण्यास बसले, वाद होताच मित्रालाच भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:24 IST

मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर हत्येचा थरार : कुख्यात गुन्हेगारांचे कृत्य, तिन्ही मारेकरी गजाआड; जखमी अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडून

छत्रपती संभाजीनगर : विक्रेत्याकडून खंडणी वसूल करून दारू पिण्यासाठी गेल्यानंतर मित्रांमध्ये वाद होत कुख्यात गुन्हेगारांनी किशोर रावसाहेब हिवाळे (२५, रा. राजनगर) याचा चाकूने खून केला. गुरुवारी दुपारी १ वाजता मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर भाजी मंडईत राजराेस रस्त्यावरील नशेच्या अड्ड्यावरच हा थरार घडला. पोलिसांनी तीन तासांत मुख्य मारेकरी दत्ता गणपत रोकडे (३८), शुभम सिद्धार्थ रणशूर ऊर्फ बड्या (१९) व कांतीलाल दौलत भुईगळ (५५, तिघे रा. मसनतपूर, शहानगर) यांना अटक केली.

किशोर काही महिने आष्टी येथे आईसोबत राहत होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो शहरात परतला होता. तीन भावांमध्ये लहान असलेला किशोर गुरुवारी सकाळी ९ वाजता घराबाहेर पडला. एपीआय कॉर्नर परिसरात एका शर्मा नामक विक्रेत्यासोबत त्याचे वाद झाले. तेव्हा दत्ता, शुभम व कांतीलालही तेथेच उपस्थित होते. दत्ताने विक्रेत्याकडून पैसे, कपडे लुटून किशोरला दुचाकीवर बसवून ते मुकुंदवाडी भाजी मंडईत दारूच्या अड्ड्यावर गेले. दारू पिताना त्यांच्यात वाद झाला. तिघांनी किशोरला मारहाण करून पोटात तब्बल १० ते १२ वेळेस वार केले. अर्धा तास तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडून किशोर मरण पावला.

दुकाने पटापट बंदहल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून जवळच राजरोस उघड्यावरच नशा केल्या जाणाऱ्या मंडईत हा प्रकार घडताच दुकाने, हॉटेल बंद झाली. माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त मनहष कल्याणकर, मुकुंदवाडीचे निरीक्षक सचिन इंगोले घटनास्थळी गेले.

झटापट करून विरोध, पोलिसांकडून बळाचा वापरदत्ता मसनतपूरमध्ये नातलगाच्या घरात लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, अंमलदार याेगेश गुप्ता, राजेंद्र साळुंके, मनोहर गिते, प्रमोद सुरसे, मंगेश शिंदे, श्रीकांत काळे, विलास कोतकर तेथे गेले. दत्ता व पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून त्याच्या मुसक्या आवळल्या. दत्ताचा साथीदार शुभम शहर सोडण्याच्या तयारीत असतानाच एमआयडीसी सिडकोचे सहायक निरीक्षक भारत पाचोळे, अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे यांनी त्यालाही पकडले. मुकुंदवाडीचे अंमलदार बाबासाहेब कांबळे, श्याम आडे, संतोष भानुसे यांनी कांतीलालला अटक केली.

हत्येला गुंडगिरी, खंडणीची किनारपोलिसांच्या माहितीनुसार, किशोर सकाळी ११ वाजता एपीआय कॉर्नर परिसरात शर्मा नावाच्या कपडे विक्रेत्याकडे गेला. तेव्हा दत्ता, शुभम, व कांतीलाल शर्माकडून पैसे व फुकट कपडे घेण्यावरून त्यांच्यात वाद झाले. शर्माने नवे कपडे व ५०० रुपये दत्ताला दिले. मात्र, किशोरने त्यापूर्वी तेथील माठांची तोडफोड केली. तेव्हा किशोरच्या हातातील चाकू हिसकावून दत्ता त्याला मुकुंदवाडीकडे घेऊन गेला व त्याच्याच चाकूने त्याची हत्या केली. खुनानंतर शर्माने दत्ताच्या टोळीवर खंडणीचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला तक्रार देण्यास सांगितले. मात्र, सायंकाळी त्याने ठाण्यातून धूम ठोकली. शर्मानेच दत्ता, शुभमला किशोरच्या हत्येसाठी उद्युक्त केले का, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमीदत्तावर यापूर्वी शहर व जालन्यात लुटमार, दरोडा, हत्येचा प्रयत्न, विनयभंग, प्राणघातक हल्ला, हत्येसारखे ८ पेक्षा अधिक गुन्हे व शुभमवर ३ गुन्हे दाखल आहेत. २०२२, २०२४ मध्ये त्याला एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध तर २०२१ मध्ये हद्दपार केले होते.

फॉरेन्सिक विभाग साडेतीन तासांनीदुपारी १ वाजता हत्येचा थरार घडला. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत घटनास्थळ तशाच अवस्थेत होते. फॉरेन्सिक विभाग तब्बल साडेतीन तासांनी ४:३० वाजता पोहोचला. त्यानंतर भाग सील करण्यात आला. तोपर्यंत शेकडो लोकांनी तेथून ये-जा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Extortion Leads to Murder: Friend Stabbed After Drinking Argument

Web Summary : A group of criminals extorted money, then fatally stabbed their friend, Kishore Hiwale, after a drunken argument in Chhatrapati Sambhajinagar. Police arrested the three main suspects, including a notorious criminal with a history of violent offenses. The incident highlights issues of gang activity and public safety.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर