शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
8
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
9
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
10
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
11
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
12
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
13
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
14
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
15
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
16
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
17
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
18
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
19
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
20
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

९ एकर जमिनीचा 'हिबानामा' अन् कोट्यवधींची फसवणूक; खासदार भुमरे यांच्या वाहन चालकावर गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:39 IST

छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली असून, शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांचे वाहन चालक आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ९ एकर जमीन व्यवहारातील फसवणुकीप्रकरणी चालकासह अन्य एकावर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील दाऊदपुरा भागातील नऊ एकर जमिनीच्या व्यवहारातून शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांचे वाहन चालक जावेद रसूल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

जबाबदारी फक्त आईचीच का? पितृत्व रजा कायदेशीर हक्क करा; राज्यसभेत राघव चड्ढांची मोठी मागणी

दाऊदपुरा परिसरातील नऊ एकर'हिबानामा' जमिनीच्या व्यवहारावरून हा सर्व वाद सुरू झाला. मुजाहिद इकबाल खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या जमिनीच्या व्यवहारात त्यांचा विश्वासघात करून मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात जमिनीचे मूळ मालक मीर मेहमूद अली आणि खासदार भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख या दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे.

मुजाहिद खान यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने दखल घेतली आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करणे. कायदेशीर प्रक्रियेत खोटी माहिती देऊन फसवणे.फिर्यादीला धमकावून दबाव तंत्राचा वापर करणे, या कलमाद्वारे गुन्हे दाखल केले आहेत.

गुन्हे शाखेकडून तपास सुरू

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाची चौकशी आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. खासदार संदिपान भुमरे यांच्या निकटवर्तीयावर हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस आता या व्यवहारातील आर्थिक धागेदोरे तपासत असून, लवकरच काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MP Bhumre's driver booked for land fraud worth crores.

Web Summary : MP Sandipan Bhumre's driver, Javed Sheikh, is accused of fraud involving a nine-acre land deal in Daudpura. He faces charges of financial deception, breach of trust, and intimidation following a complaint. The crime branch is investigating the case, stirring political reactions.
टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर