शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांचा हायटेक प्रचार

By admin | Updated: October 6, 2014 00:43 IST

औरंगाबाद : सध्या निवडणूक प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत.

औरंगाबाद : सध्या निवडणूक प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी विविध साधनांचा वापर होताना दिसतोय. त्यातच हायटेक प्रचारयंत्रणेद्वारे विकासकामांचे लाईव्ह प्रदर्शन करणारी एलईडी व्हॅन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शहरातील चौकाचौकांत दाखविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एलईडी वॉलसारख्या यंत्रणेमुळे भर उन्हातदेखील फिल्म दाखविणे शक्य झाले आहे. याच हायटेक यंत्रणेचा वापर करीत राजेंद्र दर्डा यांनी आपल्या विकासकामांच्या प्रसाराचे काम हाती घेतले. त्यांच्या या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता ही प्रचारपद्धती चांगलीच प्रभावी ठरत आहे.राजेंद्र दर्डा यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. पदयात्रांच्या माध्यमातून त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यासोबतच सध्या त्यांच्या प्रचारयंत्रणेत दाखल झालेली एलईडी मोबाईल व्हॅन लोकांचे आकर्षण ठरत आहे. राजेंद्र दर्डा यांनी आमदार, मंत्री या नात्याने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा माहितीपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला जात आहे. लहान मुलांपासनू ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण या व्हॅनला आवर्जून भेट देत आहे. एलईडी व्हॅनचे आकर्षण राजेंद्र दर्डा यांच्या कटआऊटसह निवडणूक चिन्ह पंजा आणि आकर्षक अशा घोषवाक्यांनी सजलेली ही एलईडी व्हॅन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हॅनमध्ये एलईडी वॉलद्वारे माहितीपटाचे प्रसारण केले जाते. स्क्रीनचा आकार मोठा असल्याने दूरवरच्या लोकांनाही माहितीपट स्पष्ट दिसतो. व्हॅनमध्ये साऊंड सिस्टीम, वॉल एलईडी प्रोसेसर व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या एलईडी व्हॅनद्वारे शहरातील विविध भागांमध्ये राजेंद्र दर्डा यांच्या प्रचाराचे काम हायटेक पद्धतीने जोमाने सुरू आहे. त्याला सर्वच भागांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एलईडी वॉलचा वापर आतापर्यंत आम्ही विविध कार्यक्रमांसाठी केला आहे. निवडणूक प्रचारासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची एलईडी मोबाईल व्हॅन बनविण्यात आली आहे. लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे.