वानरांच्या टोळीचा गेवराई शहरात धुमाकूळ

By Admin | Updated: May 24, 2014 00:53 IST2014-05-24T00:53:43+5:302014-05-24T00:53:43+5:30

गेवराई: पाण्याच्या शोधात गेवराई शहरात आलेल्या वानरांच्या टोळीने व्यावसायिकांसह नागरिक हैराण झाले आहेत.

A group of monkeys in the city of Gevrai | वानरांच्या टोळीचा गेवराई शहरात धुमाकूळ

वानरांच्या टोळीचा गेवराई शहरात धुमाकूळ

गेवराई: पाण्याच्या शोधात गेवराई शहरात आलेल्या वानरांच्या टोळीने व्यावसायिकांसह नागरिक हैराण झाले आहेत. महिला, लहानमुलांना वानरांच्या टोळीची भितीही वाटत आहे. ग्रामीण भागात सध्या नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या विहिरीही आटल्या असल्याने ते पिकांना पाणीही सोडत नाहीत. यामुळे ग्रामीण भागात वानरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात असलेले दहा ते बारा वानरांची टोळी शुक्रवारी गेवराई शहरात आली. या टोळीतील वानरे नागरिकांच्या घरावरून उड्या मारत आहेत. तसेच घरासमोरील रांजण, माठातील तसेच इतर भांड्यातील पाणीही पित आहेत. अचानक घरात वानर आल्याने कुटुंबियात भीती पसरत आहे. वानरांच्या टोळीने शिवाजी चौक, सावतानगर, संजयनगर, गजानन नगर, शास्त्री चौक येथील नागरिकांना हैराण केले आहे. वानरे हॉटेलच्या पत्र्यावर उघड्या मारत असल्याने व्यापारीही त्रस्त झाले आहेत. वानरे अनेकदा फळ विक्रेत्यांच्या गाड्यावरील फळावरही ताव मारतात. यामुळे व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे. यामुळे वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मनोज जयस्वाल, उमेश मानधने, महावीर मडकर, गणेश नेवाळे यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: A group of monkeys in the city of Gevrai