शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथरावांचे होते परभणीवर विशेष लक्ष...

By admin | Updated: June 4, 2014 00:44 IST

परभणी : ज्या बीड जिल्ह्यातून गोपीनाथराव मुंडे राष्टÑीय पातळीवर पोहोचले, त्या बीडच्या शेजारील परभणी जिल्ह्यावरही गोपीनाथरावांचे विशेष लक्ष असायचे.

परभणी : ज्या बीड जिल्ह्यातून गोपीनाथराव मुंडे राष्टÑीय पातळीवर पोहोचले, त्या बीडच्या शेजारील परभणी जिल्ह्यावरही गोपीनाथरावांचे विशेष लक्ष असायचे. कोणत्याही आंदोलनाला बळ मिळविण्यासाठी अनेक वेळा गोपीनाथरावांनी परभणीत सभा घेतल्या. त्यांच्या सभांना प्रतिसादही मोठा मिळायचा आणि यातूनच गोपीनाथराव आणि परभणी जिल्हा असे एक वेगळे नाते निर्माण झाले. गोदा परिक्रमा असो की संघर्ष यात्रा किंवा ऊस- कापसाचे आंदोलन असो. या जिल्ह्याने नेहमीच त्यांना साथ दिली आहे. बीड जिल्ह्याचे सुपुत्र आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अशी ओळख असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांची नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून वर्णी लागली. या माध्यमातून आता मराठवाड्यातील अनेक प्रश्न मार्गी लागून विकास होईल, अशी सर्वसामान्यांना खात्री होती. परंतु आज सकाळी मुंडे यांच्या निधनाची दु:खद बातमी आली आणि परभणीकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त जिल्हाभर वार्‍यासारखे पसरले. जो तो एक-दुसर्‍याशी या दु:खद घटनेची विचारपूस करुन ‘फार वाईट’ झाले अशी भावना बोलून दाखवित होता. मुळात गोपीनाथराव बीड जिल्ह्यातले असले तरी परभणी जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. परभणी जिल्ह्यावर असलेल्या त्यांच्या विशेष प्रेमामुळे या जिल्ह्यातील सामान्य माणसालाही गोपीनाथराव जवळचे वाटायचे. या भावनेतूनच आज मुंडे यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र शोकभावना व्यक्त होऊ लागल्या. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी आदींनी मुंडे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करुन आपले आणि मराठवाड्याचे फार नुकसान झाले, असे बोलून दाखविले. गोपीनाथराव कोणत्याही कार्यक्रमाच्या, निवडणुकीच्या किंवा आंदोलनाच्या निमित्ताने परभणीला येत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत यातूनच या जिल्ह्यातील अगदी तळागाळातील कार्यकर्ताही मुंडेशी जुळला होता. राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून मुंडे यांचे परभणी आणि या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडे विशेष लक्ष होते. गोदापरिक्रमा, संघर्ष यात्रा, शेतकर्‍यांची कर्जमाफी, वेगवेगळ्या निवडणुका, ऊस, कापूस दराचे आंदोलन, समाज मेळावे आदींच्या निमित्ताने मुंडे परभणी जिल्ह्यात अनेकदा आलेले आहेत. याशिवाय कार्यकर्त्यांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमासही गोपीनाथराव आवर्जून उपस्थित रहायचे. यामुळे कार्यकर्त्यांचा ऊर भरुन यायचा. या संदर्भातील मुंडे यांच्या सहवासातील आठवणी सांगून कार्यकर्त्यांनी आज आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. (प्रतिनिधी)महायुतीचे शिल्पकार म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्याकडे बघितले जायचे. महायुतीच्या कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारासाठी गोपीनाथराव परभणीत आवर्जून यायचे. विशेषत: आपल्या समाजबांधवांची संख्या लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीत ते जिंतूर, गंगाखेडला जाहीर सभा घ्यायचे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून गोपीनाथरावांचे परभणी जिल्ह्यावर विशेष लक्ष होते. यामुळेच परभणीकरांनाही गोपीनाथराव कधी परके वाटले नाहीत. त्यांच्या निधनामुळे केवळ बीड जिल्ह्याचाच नव्हे, तर आपलाही पालक काळाच्या पडद्याआड गेला, अशा भावना परभणीकरांनी व्यक्त केल्या.