शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडचे नगरसेवक सहलीवर

By admin | Updated: May 29, 2014 00:21 IST

गंगाखेड: आगामी जून महिन्यापासून अडीच वर्षांसाठी गंगाखेडचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी सुटले आहे.

गंगाखेड: आगामी जून महिन्यापासून अडीच वर्षांसाठी गंगाखेडचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी सुटले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्षपदासाठी घडामोडीला वेग आला असून राजकारण तापू लागले आहे. त्यातूनच दोन्ही गटांचे २३ नगरसेवक सहलीवर गेले आहेत. येथील नगराध्यक्षपद डिसेंबर २०११ ते जून २०१४ या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी खुल्या प्रवर्गाला सुटले होते. सहा प्रभागातून राष्ट्रवादीचे १०, भाजपाचे ५, शिवसेना २, काँग्रेस ४, अपक्ष १ आणि घनदाट मित्रमंडळ १ असे २३ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून भाजप-शिवसेना- काँग्रेस व घनदाट मित्रमंडळाच्या नगरसेवकाने गंगाखेड पॅर्टन राबवून नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले. यावेळी खुल्या प्रवर्गातून डिसेंबर २०११ ते मार्च २०१३ या सव्वा वर्षासाठी अलका बाळकाका चौधरी या नगराध्यक्षा झाल्या. मार्च २०१३ ते जून २०१४ साठी खुल्या प्रवार्गातून सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष म्हणून रामप्रभू मुंडे यांची निवड झाली. जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापासून येथील नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी अडीच वर्षांच्या काळासाठी राखीव आहे. आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, नगरपालिकेवर आपली सत्ता असावी आणि आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा, असे वाटत असल्याने नगरसेवकांना सहलीला जावे लागले आहे. राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे ४ व अपक्ष १ असे १५ नगरसेवक डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासोबत गेल्याचे बोलले जात आहे. तर भाजपा ५, शिवसेना २, मित्रमंडळ १ व राकाँचे दोन-तीन नगरसेवक रामप्रभू मुंडे यांच्यासोबत सहलीला गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गंगाखेडच्या राजकारणात बर्‍याच घडामोडी होण्याचे चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काँग्रेस आघाडीचा धर्म पाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास गंगाखेड पॅटर्नला खो बसणार आहे. (प्रतिनिधी)

गंगाखेड नगरपालिकेतील उर्मिला मधुसूदन केंद्रे, संजीवनी श्रीधरराव मुरकुटे (राष्ट्रवादी काँग्रेसच्या), अ‍ॅड. सुप्रिया श्रीराम मुंडे (अपक्ष), जयश्री रामप्रभू मुंडे (भाजप), वर्षा गोविंद यादव (काँग्रेस) या पाच महिलांपैकी नगराध्यक्ष कोण होणार, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.