शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात भर वस्तीत 'गँग वॉर'ची धडकी; कुख्यात गुन्हेगाराचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:21 IST

मिरवणुकीत गुन्हेगाराचे फोटो झळकल्याच्या कारणावरून वर्चस्ववाद आला उफाळून

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये ‘गँग वाॅर’ उफाळून आले. दोन दिवसांपासून वर्चस्ववादातून धुमसत असलेल्या वादानंतर गुरुवारी रात्री ९ वाजता पवन अनिल दिवेकर (३०) याने हनुमाननगरमध्ये रात्री ९ वाजता गोळीबार करीत पोलिसांना आव्हान दिले. सात दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या गुन्ह्यांच्या सत्रामुळे शहर हादरून तर गेलेच. मात्र, पोलिसांचा गुन्हेगारांवरचा धाक संपल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रात्री उशिरापर्यंत पवन दिवेकर, त्याचा विरोधक सुरेश रांजणे याचा शोध सुरू होता.

दिवेकर व रांजणे यांच्यामध्ये काही दिवसांपासून वर्चस्ववादातून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी हनुमाननगर, तर गुरुवारी दुपारी न्यायनगरमध्ये या टोळ्या आमनेसामने आल्या होत्या. रात्री ९ वाजेच्या सुमारास पवन दिवेकर, त्याचा नातलग साळवे व अन्य टवाळखोर हनुमाननगरमध्ये उभे असताना तेथे रांजणे गेला. त्यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. त्यातच दिवेकरने पिस्तूलद्वारे थेट हवेत गोळी झाडली. पोलिसांच्या दाव्यानुसार, त्याने एक गोळी झाडली. त्याचे काडतूस घटनास्थळी मिळून आले, तर प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, पवनने जवळपास तीन वेळा गोळी झाडत दहशत निर्माण केली. घटनेनंतर परिसरात एकच हल्लकल्लोळ उडाला. नागरिक सैरावैरा पळाले. काही क्षणांत दुकाने बंद झाली. पुंडलिकनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दंगा काबू पथकही तैनात करण्यात आले. घटनेनंतर साळवेला ताब्यात घेतले, तर दिवेकर, रांजणे पसार झाले.

मिरवणुकीत फोटो झळकल्यावरून वादकुख्यात गुन्हेगार दिवेकर १४ एप्रिल रोजी मिरवणुकीत सहभागी झाला होता. तेव्हा त्याच्या साथीदारांनी त्याच्या छायाचित्रासह मिरवणुकीत नाच केला. त्यावरून पुंडलिकनगर, हनुमाननगर, न्यायनगर, भरतनगरमधील गुंडांचा वर्चस्ववाद उफाळून आला. गुरुवारच्या गोळीबाराला याच वादाची किनार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी असलेल्या दोन टपऱ्यांवर व्याजाने पैसे देणारे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नेहमी ऊठबस असते. या सर्व टपऱ्या अवैध असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही.

पीडी कंपनी नावाने टोळी चालवतोदिवेकरवर यापूर्वी छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे ८ गंभीर गुन्हे आहेत. २०२३ पासून एका खुनाच्या गुन्ह्यात पसार दिवेकरला ३ फेब्रुवारी, २०२५ रोजी गुन्हे शाखेने अटक केली होती. मार्चअखेर तो जामिनावर सुटला. २०१९ मध्ये पुंडलिकनगरमधील एका खून प्रकरणात त्याने साडेतीन वर्षे तुरुंगवास भोगला आहे. ११ डिसेंबर २०२३ रोजी गजानन तौर हत्याकांडावेळी पवन तौरच्या कारमध्ये उपस्थित होता. दोन दिवसांपूर्वी त्याने तौर हत्याकांडाचा बदला घेणार असल्याचे स्टेटस ठेवले होते. तो पीडी नावाने टोळी चालवतो. मात्र, पोलिसांना याविषयी कुठलेच गांभीर्य नसल्याचे वारंवार समोर आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gang war erupts in Chhatrapati Sambhajinagar; notorious criminal opens fire.

Web Summary : Rival gangs clashed in Chhatrapati Sambhajinagar, with Pawan Divekar firing shots in Hanuman Nagar. A dispute over dominance fueled the violence, highlighting a perceived decline in police control and raising public safety concerns.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर