इंस्टाग्रामवरील मैत्री नडली! जलसंपदाच्या उपअभियंत्याचा विवाहितेवर अत्याचार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:31 IST2026-04-30T12:29:51+5:302026-04-30T12:31:51+5:30

"व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी"; हिंगोलीत कार्यरत असलेल्या उपअभियंत्याचा शहरातील हॉटेलमध्ये धुमाकूळ

From Instagram Friendship to Blackmail & Abuse: Rape Case Filed Against Irrigation Dept Deputy Engineer in Chhatrapati Sambhajinagar | इंस्टाग्रामवरील मैत्री नडली! जलसंपदाच्या उपअभियंत्याचा विवाहितेवर अत्याचार, गुन्हा दाखल

इंस्टाग्रामवरील मैत्री नडली! जलसंपदाच्या उपअभियंत्याचा विवाहितेवर अत्याचार, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमाचे नाटक करून एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी जलसंपदा विभागातील उपअभियंता वैभव विजय पाटील याच्यावर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सध्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात कार्यरत आहे.

कॉफीच्या बहाण्याने बोलावून ब्लॅकमेलिंग
तक्रारदार महिला आणि वैभव यांची जुलै २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. १६ जुलै रोजी कॉफी पिण्याच्या बहाण्याने वैभवने पीडितेला बोलावले आणि आलिशान कारमधून फिरवले. पीडितेच्या आरोपानुसार, त्यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटिंग तिच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन त्याने पहिल्यांदा तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले.

चित्रीकरण करून वारंवार अत्याचार
आरोपीने अत्याचाराचे चित्रीकरण केले असून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याच धमकीच्या आधारे २५ जुलै ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शहरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार करण्यात आले. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली, ज्यावरून वैभव पाटीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title : इंस्टाग्राम दोस्ती पड़ी भारी: इंजीनियर पर बलात्कार का आरोप, मामला दर्ज

Web Summary : इंस्टाग्राम पर दोस्ती के बाद जलसंपदा विभाग के इंजीनियर वैभव पाटिल पर एक विवाहित महिला से बलात्कार का आरोप है। कथित तौर पर उसने ब्लैकमेल कर होटलों में बार-बार शोषण किया। पाटिल के खिलाफ मामला दर्ज।

Web Title : Instagram Friendship Turns Sour: Engineer Accused of Rape, Case Filed

Web Summary : A जलसंपदा department engineer, Vaibhav Patil, is accused of raping a married woman after befriending her on Instagram. He allegedly blackmailed her with compromising content, leading to repeated abuse in hotels. A case has been filed against Patil.