शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे यांच्यावर विसंबून होते भावी राजकारण

By admin | Updated: June 6, 2014 01:02 IST

सतीश जोशी, परभणी- केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे नेते गोपीनाथ मुंंडे यांच्या जाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारणालाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे.

सतीश जोशी, परभणी
केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे नेते गोपीनाथ मुंंडे यांच्या जाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारणालाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याचे राजकारण बदलण्याची चिन्हे दिसत होती, तशा हालचालीही सुरू झाल्या होत्या.
गोपीनाथ मुंडे यांची जरी वंजारी समाजाचे दैवत म्हणून ओळख असली तरी मुंडे यांचा आपल्या समाजाप्रमाणेच इतर जातीधर्मावरही चांगला प्रभाव होता. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यात वंजारी समाजाप्रमाणे ओबीसी मतदारांचाही प्रभाव आहे. निवडणूक विधानसभा, लोकसभेची असो की नगर परिषद, जिल्हा परिषदेची. मुंडे यांच्या एका सभेमुळे वातावरण बदलत असे. हा मतदार भाजपा-शिवसेना महायुतीकडे वळविताना त्यांनी जातपात, नात्यागोत्याच्या राजकारणालाही थारा दिला नव्हता. त्यांच्या समाजात तर मुंडे सांगतील हीच पूर्वदिशा असे. मुंडे यांनी परळीप्रमाणेच गंगाखेडलाही जीव लावलाच नाही तर या मतदार संघात भाजपाचे अस्तित्व जिवंत ठेवले. गंगाखेडमध्ये वंजारा समाजासोबत हटकर, धनगर समाजालाही बरोबरीने सोबत घेऊन भाजपा - शिवसनेची ताकद निर्माण केली होती. मुंडे यांनी गंगाखेड येथे तर ग्रामपंचायत निवडणुकीपासून पालिका, जि. प. आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची ताकद बाळगणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते तयार केले होते. आज या मंडळीचा आत्मविश्वास हा मुंडे यांच्या जाण्यामुळे डळमळीत झाला आहे. असाच प्रभाव त्यांचा जिंतूर तालुक्यातील वंजारी आणि ओबीसी समाजावर होता. जिंतूर मतदार संघात असलेली ही गठ्ठा मते तालुक्यातील निवडणुकीची दिशा बदलत होती.
नुकत्याच झालेल्या परभणी लोकसभा निवडणुकीत जिंतूरचे काँग्रेसचे आ. रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडचे आ. सीताराम घनदाट, राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांनी उघडउघड शिवसेनेचे उमेदवार खा. बंडू जाधव यांचा प्रचार करून शिवसेनेच्या विजयास हातभार लावला होता. संपूर्ण भारतात जरी नरेंद्र मोदी यांची लाट होती तरी परभणी लोकसभा मतदार संघात या लाटेला गती देण्याचे काम निश्चितच या मंडळीनी केले. त्यांची ही कृती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणाला कदाचित वळण देणारीही ठरली असती. हे सर्व बदलते राजकारण गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना केंद्रबिंदू माणून वळणावर होते. लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने तर आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि गोपीनाथ मुंडे यांचा अनेकदा सुसंवादही झाला होता. या न त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांची जवळीक वाढत चालली होती. कारण जिंतूर विधानसभा मतदारसंघात असलेले वंजारा समाजाचे गठ्ठा मतदान मुंडे यांच्या आशीर्वादाने कॅश करण्याचा बोर्डीकर यांचा हा प्रयत्न होता. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या एकतर्फी यशामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेते मंडळीही विचलित झाली होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे हे जिल्ह्यातील राजकारण बदलतील, अशी चिन्हे आणि चर्चा चालू असतानाच मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे या बदलत्या राजकारणाबद्दल प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.