अनोळखी मुलाच्या उपचारार्थ खर्च केले दीड लाख

By Admin | Updated: January 4, 2016 00:12 IST2016-01-03T23:22:48+5:302016-01-04T00:12:20+5:30

बीड : पैशासाठी भाऊ भावाचा खून करीत आहे. धावत्या जगात माणुसकी गोठत चालली आहे; मात्र अशा बदलत्या परिस्थितीतही बीड येथील मजहरखान हबीबखान यांनी

Five lakhs spent on the treatment of an unknown child | अनोळखी मुलाच्या उपचारार्थ खर्च केले दीड लाख

अनोळखी मुलाच्या उपचारार्थ खर्च केले दीड लाख


बीड : पैशासाठी भाऊ भावाचा खून करीत आहे. धावत्या जगात माणुसकी गोठत चालली आहे; मात्र अशा बदलत्या परिस्थितीतही बीड येथील मजहरखान हबीबखान यांनी एका अनोळखी जखमी मुलास वाचविण्यासाठी तब्बल वीस दिवस स्वत:च्या खिशातून दीड लाख रुपये खर्च केले. त्यांच्या या आदर्श कृतीतून माणुसकीचे दर्शन दिसून आले.
वायबटवाडी (ता. बीड) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा शंकर बोराळे हा अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडला होता. तो गंभीर जखमी असल्याची बाब रस्त्यावरून जाणाऱ्या मजहरखान हबीबखान यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मित्रांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने त्याची प्रकृती गंभीर होत होती. त्यामुळे मजहरखान यांनी शंकरला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. शंकरचा हात तुटला होता. त्याचे लिव्हर पूर्णपणे डॅमेज झाले होते. त्या मुलाचे दोन आॅपरेशन करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मजहरखान यांनी मित्रांकडून काही पैसे घेऊन व स्वत:चे असे मिळून एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा भरणा केला. त्यांच्या सत्कार्याला नियतीने साथ दिली व शंकरचे जीवन वाचले.
ऊसतोड मजूर कुटुंबाकडे खाजगी दवाखान्यासाठी द्यायला पैसे नव्हते. अशा परिस्थितीत मजहरखान यांनी पुढाकार घेतला. जाती-धर्माचा विचार न करता मजहरखान यांनी शंकरचे वेळेवर धावून प्राण तर वाचविलेच; शिवाय खाजगी दवाखान्याचा खर्चही उचलला. (प्रतिनिधी)

Web Title: Five lakhs spent on the treatment of an unknown child