शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर क्रीडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये; अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 16:39 IST

जागा निश्चित झाल्यानंतरही नियोजित क्रीडा विद्यापीठ तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्याला पळवले होते

छत्रपती संभाजीनगर: पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केली. वाळूज येथे हे विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

सन २०१४ - २०१९ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी करोडी येथील १७० एकर जागेची देखील निश्चिती झाली. मात्र, सन २०१९ मध्ये सरकार बदलताच तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी क्रीडाविद्यापीठ पुण्याला पळवत बालेवाडी येथे उभारले. या निर्णयावर मोठी टीका झाली होती. तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात विद्यापीठ उभारण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगत दुसरे क्रीडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे उभारू असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतर राज्यातील सरकार बदलले. मात्र, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पात केली. या विद्यापीठासाठी तब्बल ५० कोटी निधींची तरतूद देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील उत्तम क्रीडापटूंना दर्जेदार सरावासाठी छत्रपती संभाजीनगर येथील करोडी परिसरातील गट नं. २४ येथील १७० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल. या विद्यापीठात क्रीडा संदर्भात विविध अभ्यासक्रम असतील. याद्वारे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम आणि कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या संधी युवकांना मिळतील. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस