शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धिंड, एन्काऊंटरची भीती, कुख्यात गुन्हेगार टिप्या घाबरून थेट न्यायालयात शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:19 IST

गंभीर गुन्हा करून पसार झालेला टिप्या पसार होऊन यापूर्वी दोनवेळेस थेट न्यायालयात शरण आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : वाळुज येथे झालेले एन्काऊंटर, शहरात गुन्हेगारांच्या काढल्या जात असलेल्या धिंडीप्रमाणेच हाल होण्याच्या भीतीने महिन्याभरापासून पसार असलेला कुख्यात गुन्हेगार टिप्या ऊर्फ जावेद मसूद शेख (रा. विजयनगर) हा गुरूवारी दुपारी स्वत:हून न्यायालयात शरण आला. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

जुलै अखेरीस मोक्कासारख्या गंभीर कारवाईत टिप्या जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या दहाच दिवसांत त्याने २ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता व्यावसायिक शेख अझर शेख गणी (वय ४०) यांना बारमध्ये खंडणी मागितली. ती देण्यास नकार देताच अन्य पाच गावगुंडांच्या मदतीने गारखेड्यात अडवून मारहाण करून तलवारीचा धाक दाखवत त्यांची दुचाकी व अडीच लाख रुपये लुटून नेले होते. शिवाय, सकाळपर्यंत आणखी पैशांची खंडणी मागितली. या घटनेनंतर टिप्या पसार झाला होता. जवळपास महिनाभर तो परराज्यात फिरत होता. पुंडलिकनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही त्याच्या मागावर होते. मात्र, पोलिस दलातील काही लोकांच्या संपर्कात असल्याने तो शोध पथकांना गुंगारा देत फिरत होता.

कायम न्यायालयात शरण येतोगंभीर गुन्हा करून पसार झालेला टिप्या पसार होऊन यापूर्वी दोनवेळेस थेट न्यायालयात शरण आला आहे. याहीवेळी वाळुज एन्काऊंटरप्रमाणे आपलेही हाल होण्याची भीती त्याला काही दिवसांपासून सतावत होती. शिवाय, गुन्हेगारांच्या काढल्या जाणाऱ्या धिंडीच्या बातम्या ऐकल्यानंतर तो पोलिसांऐवजी न्यायालयात शरण आला. गणेशोत्सवानंतर त्याचा ताबा घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मुकेशचा शर्टने आत्महत्येचा प्रयत्न, धिंगाणामुकुंदवाडीत दोघांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुकेश महेंद्र साळवे याने पोलिसांना अडचणीत आणण्याच्या उद्देशाने पाेलिस कोठडीत शर्टच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी दुपारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात या घटनेने पोलिसांची एकच धावपळ उडाली. तुम्हाला अडचणीत आणतो, अशी धमकी देत त्याने हे कृत्य केले. त्यानंतर त्याला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेताना त्याने पोलिस वाहनात आरडाओरड करत जाळीवर डोके आपटून धिंगाणा घातला. पोलिसांनी याची रितसर नोंद केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी