शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून भररस्त्यात कोयत्याने वार करून हत्या; बाप-लेकाला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:35 IST

पत्नी आणि मुलासमोरच केला होता पतीचा खून; सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी सुनावली जन्मठेप

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून सुनील चौधरी (रा. चौधरी गावणी, ता. सोयगाव) यांच्या खुनाच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी ज्ञानेश्वर रामदास चौधरी (५०) आणि हेमंत ज्ञानेश्वर चौधरी (२१, दोघे रा. सोयगाव) या बाप-लेकास जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला.

काय होती घटना?मनीषा सुनील चौधरी (३४, रा. चौधरी गवणी, ता. सोयगाव) यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती सुनील चौधरी १७ जुलै २०२१ रोजी सायंकाळी शेतातील काम आटोपून दुचाकीने घरी परतत होते. त्यांचा मुलगा कार्तिक सायकलवरून मागून येत होता. लिहातांडा ते सोयगाव रस्त्यावर ज्ञानेश्वर चौधरी व त्याचा मुलगा हेमंत यांनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी शिवीगाळ करीत दोघांवर हल्ला केला.ज्ञानेश्वरने हातातील कोयत्याने सुनील चौधरी यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्यानंतर खाली कोसळलेल्या सुनील चौधरी यांना हेमंत चौधरी याने गळा व चेहऱ्यावरही वार करीत गंभीर जखमी केले. पतीला वाचविण्यासाठी मनीषा चौधरी आल्या असता ‘तुम्ही जास्त माजले, तुम्हाला मस्ती आली, आता तुम्हाला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत ज्ञानेश्वरने कोयत्याने त्यांच्यावरही वार केले. त्यांच्या हातावर व पाठीवर मार लागला. हल्ल्यानंतर सुनील चौधरी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान सुनील यांचा मृत्यू झाला. याबाबत सोयगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याची सुनावणी व आदेशखटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर व फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने वरील दोघा आरोपींना दोषी ठरवून भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ सह ३४ अन्वये प्रत्येकी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपींना दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार नितीन जाधव यांनी काम पाहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Father and son get life sentence for roadside murder over feud.

Web Summary : A father and son received life sentences for murdering Sunil Choudhary over an old dispute. They attacked him with a sickle on a road in Soygaon, leading to his death. The court found them guilty based on witness testimonies.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर