पाषाणावर साकारले फडणवीसांचे चित्र!

By Admin | Updated: August 10, 2015 00:50 IST2015-08-10T00:50:16+5:302015-08-10T00:50:16+5:30

प्रसिद्ध चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी पाषाणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चित्र साकारले आहे. संबंधित ‘पाषाणचित्र’ लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी

Fadanvis pictured on the stone! | पाषाणावर साकारले फडणवीसांचे चित्र!

पाषाणावर साकारले फडणवीसांचे चित्र!

नागपूर : प्रसिद्ध चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी पाषाणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चित्र साकारले आहे. संबंधित ‘पाषाणचित्र’ लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिले. प्रमोदबाबू यांनी ‘अ‍ॅक्रेलिक’रंगाचा वापर करून ही कलाकृती साकारली असून, जगात पहिल्यांदाच पाषाणावर असे चित्र साकारण्यात आले आहे.
प्रमोदबाबू यांनी मुख्यमंत्र्यांचे चित्र साकारलेल्या पाषाणाला हाताने किंवा इतर साहित्याने कोरून कुठलाही आकार दिलेला नाही. प्रमोदबाबूंनी काढलेल्या अशाप्रकारच्या कलाकृतींचे नागपुरात आयोजित केलेल प्रदर्शन हे जगातील पहिलेच प्रदर्शन होते.
खा. दर्डा यांनी संबधित कलाकृती मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संबंधित पाषाणावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे हास्यमुद्रेतील चित्र काढण्यात आले आहे. फडणवीस स्वत:चे पाषाणचित्र पाहून थक्क झाले. फडणवीस यांनी दिलखुलासपणे या कलाकृतीची प्रशंसा केली व उपस्थितांसह या कलाकृतीच्या मागे उभे राहून विजयी मुद्रेची पोज देत छायाचित्र काढले. यावेळी दिलीप छाजेड व बिपीन सुळे उपस्थित होते.

Web Title: Fadanvis pictured on the stone!