शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

दौलताबादेत घातक रसायनांद्वारे सुगंधी तंबाखूचे उत्पादन करणारा कारखानाच उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:43 IST

ऑगस्टमध्ये जिल्हा पोलिसांनी लक्ष केल्याने कसाबखेड्यात कारखाना स्थलांतरित

छत्रपती संभाजीनगर : दौलताबादच्या कसाबखेड्यात घातक रसायनांद्वारे सुगंधी तंबाखूचे उत्पादन करणारा कारखाना उघडण्यात आला होता. एनडीपीएस पथकाने सुगंधित तंबाखूची वाहतूक सुरू असलेला टेम्पो पकडल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. आमिर फरिद मेमन (रा. कटकट गेट) याने तो सुरू केला होता.

एनडीपीएसच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना दौलताबाद परिसरातून रोज सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी रात्री जांभळा गावात सापळा रचला. संशयित टेम्पोला थांबवल्यानंतर त्यात तंबाखू आढळून आली. चालक शेख हारुण शेख रहिम (रा. राहुलनगर) व त्याचा साथीदार मोहम्मद सिद्दीकी इमरान (रा. जहागीरदार कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी आमिर मेमनच्या कारखान्यातून हा माल घेऊन जात असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने कारखान्यावर छापा टाकला.

घातक रसायनांचा वापर
पत्र्याच्या शेडमध्ये उभारण्यात आलेल्या कारखान्यात घातक रसायनांचा वापर करून अत्यंत खराब तंबाखूला सुगंधित केले जात होते. तेथून जिल्ह्यासह शहरात त्याचा पुरवठा होताे. विशेष म्हणजे, कुठल्याही बिल, नोंदणीशिवाय हा सर्व व्यवहार चालतो. यात चालकांना अटक झाली. कारखान्यावर पोलिस आल्याचे कळताच मेमन मात्र पसार झाला. बागवडे यांच्यासह उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार सुनील बेलकर, लालखान पठाण, महेश उगले, सतीश जाधव, संदीप धर्मे यांनी कारवाई केली. कारखान्यातून १३० किलो सुंगंधित तंबाखू, ८६५ किलो साधी तंबाखू (कच्चा माल) व ११५ लिटर घातक रसायन पोलिसांनी जप्त केले.

म्हणून शहर पोलिसांच्या हद्दीत
आमिर फरिद मेमनचे वडील महंमद फरिद यांच्यावर असे कारखान्याचे, गुटखा विक्रीचे अनेक गुन्हे आहेत. २०२४ मध्ये त्यांनी खुलताबादमध्ये मंगल कार्यालयात कारखाना उघडला होता. जिल्हा पोलिसांनी ऑगस्टमध्ये तेथे कारवाई करत लक्ष्य केल्याने फरिदने तो शहर पोलिसांच्या हद्दीत सुरू केला. यापूर्वी हर्सुल, दौलताबाद फार्म हाऊसमध्ये कारखाने उघडले होते. गुजरातमधून मालाचा पुरवठा होतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर