शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक शैलेन्द्र राजपूत खून प्रकरण; पतीच्या खुनाचा पूजाला झाला पश्चात्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 18:22 IST

पूजा राजपूतला २३ पर्यंत पोलीस कोठडी

ठळक मुद्देमुलींना भेटण्याची इच्छा

औरंगाबाद : कौटुंबिक वादातून रागाच्या भरात उद्योजक पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पूजा राजपूतला आता पश्चात्ताप होत आहे. महिला पोलिसांशी बोलताना तिने याविषयी खंत व्यक्त करीत, मुलींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयाने पूजाला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

उल्कानगरी भागातील मे-फेअर या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या उद्योजक शैलेंद्र शिवसिंग राजपूत आणि त्यांची पत्नी पूजा राजपूत यांचे आर्किटेक्ट मैत्रिणीवरून सोमवारी मध्यरात्री भांडण झाले होते. हा वाद विकोपाला जाऊन शैलेंद्रने पूजाला मारहाण केल्याने पूजाने रागाच्या भरात शैलेंद्रवर चाकूने वार केला. यात शैलेंद्रचा मृत्यू झाला. घटनेनंतर  जवाहरनगर पोलिसांनी पूजाला अटक केली. घटनेच्या २४ तासांपर्यंत पूजा  ही केवळ शांत    बसून होती. पतीसोबत भांडण कशावरून झाले आणि त्याला कशाने मारले, त्याला रुग्णालयात का नेले नाही, अशी विचारणा शैलेंद्रच्या भावांनी वारंवार तिच्याकडे केल्यानंतर तिने काहीच सांगितले नाही. दोन महिला पोलीस तिच्यासोबत आहेत.

घटनेला ३६ तास उलटल्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी पूजाला लॉकअपमधून जवाहरनगर पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा महिला पोलिसांशी बोलताना पूजाने पतीला मारल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांचे परस्परांवर प्रचंड प्रेम होते. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्यात सतत खटके उडत. परंतु शैलेंद्रवरील प्रेम काही कमी झाले नव्हते. राग एवढा अनावर झाला होता, की स्वयंपाकघरातून चाकू आणून शैलेंद्रवर वार करण्याचे धाडस केले. मात्र घाव थेट अवघड ठिकाणी जांघेत लागल्याने शैलेंद्रचा मृत्यू झाला. या कृत्याचा आता पश्चात्ताप होत असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पूजाला २३ पर्यंत पोलीस कोठडीजवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शशिकांत तायडे आणि कर्मचाऱ्यांनी पूजाला बुधवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  व्ही. डी. सुंगारे यांच्या न्यायालयात हजर केले. ४ सहायक सरकारी वकील पी. पी. जरिना यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपी पूजा हिचे रक्ताने माखलेले कपडे जप्त करणे, पतीच्या खुनामागे नेमका काय वाद आहे, याबाबत पूजाची चौकशी करायची आहे, तसेच या खुनात आणखी कोणी तिचे साथीदार आहेत का? यासंदर्भात तपास करायचा असल्याने पूजाला ७ दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. सरकार पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पूजाला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद