शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपानंतरही वाढले अभियंत्यांचे अधिकार

By admin | Updated: December 20, 2015 23:57 IST

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील टक्केवारीपुराण बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमक्ष ५ डिसेंबर रोजी कंत्राटदारांनी वाचले.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील टक्केवारीपुराण बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमक्ष ५ डिसेंबर रोजी कंत्राटदारांनी वाचले. ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप झाल्यानंतरही अभियंत्यांच्या वित्तीय अधिकारात वाढ करून शासनाने त्यांना ‘गिफ्ट’ दिले आहे. हा टक्केवारीच्या आरोपांमुळे अभियंत्यांना लावलेला चाप आहे की, यंत्रणेला रानमोकळे करून दिले आहे, याबाबत काही समजण्यास मार्ग नाही. १६ डिसेंबर रोजी वित्तीय अधिकारात सुधारणा करण्यात आल्याच्या निर्णयाचा अध्यादेश बांधकाम विभागाने जारी केला आहे. महागाई निर्देशांकात १९९६ पासून २०१५ पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याने मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांच्या निविदेच्या तांत्रिक आणि मंजुरीच्या अधिकारात वाढ झाली आहे. १९८४ पासून १९९६ पर्यंत तीन वेळेस बांधकाम नियम पुस्तिकेमधील परिशिष्ट ४२ नुसार वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे; परंतु सद्य:स्थितीत बांधकाम साहित्याच्या किमतीत व मजुरीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे अधिकारांमध्ये सुधारणा करण्याची गरज होती, असे शासनाने अध्यादेशात म्हटले आहे. १९९६ च्या तुलनेत आजघडीला कामांची संख्या आणि खर्चाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांकडे निविदा मंजुरीचे प्रमाण वाढले. कामाचा ताण अधिक वाढल्यामुळे कार्यकारी अभियंत्यांकडे विशेष अशी कामे राहिलेली नव्हती. त्यामुळे वित्तीय अधिकारांत सुधारणा करण्यात आली आहे. तांत्रिकरीत्या निविदा मंजूर करणे व निविदा मान्य करण्याचे जास्तीचे अधिकार कार्यकारी अभियंता पातळीवर वाढले आहेत. मुख्य आणि अधीक्षक अभियंत्यांकडे १०० ते २०० निविदा मंजुरीची कामे रेंगाळून पडत असल्यामुळे वित्तीय सुधारणा करून कामांच्या जबाबदारीचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे बांधकाम विभागातील रेंगाळलेली कामे जलदगतीने होतील, असा दावा सूत्रांनी केला.