शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट शिक्षण झालेल्या विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी

By admin | Updated: May 24, 2014 00:42 IST

परभणी : जिल्ह्यातील १० ते १६ या वयोगटातील ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण अर्धवट झाले आहे, अशा विद्यार्थिनींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या झाले आहे.

परभणी : जिल्ह्यातील १० ते १६ या वयोगटातील ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण अर्धवट झाले आहे, अशा विद्यार्थिनींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. या शाळेत अशा मुलींना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. गंगाखेड, ंिजंतूर, मानवत, परभणी, पाथरी, पूर्णा व सेलू या ठिकाणी शासनाने २००८-०९ पासून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या नावाने निवासी शाळा सुरु केली आहे. पाचवी ते दहावी या वर्गात १५० मुलींना प्रवेश दिला जातो. नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात निवास, भोजन, गणवेश, दैनंदिन गरजेच्या वस्तू व इतर सुविधा पुरविल्या जातात. शाळेत दाखल करण्यात आलेल्या मुलींच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांची तयारीही करुन घेतली जाते. तसेच संगणक शिक्षण, शिवणकाम, हस्तकलेच्या वस्तू तयार करणे, दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार करणे, बेनटेक्स ज्वेलरी तयार करणे अशी व्यावसायिक प्रशिक्षणही या ठिकाणी दिली जातात. स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण त्याचप्रमाणे चित्रकला, संगीत, क्रीडा आदी विषयांसाठी सर्व भौतिक सुविधा व तज्ज्ञ शिक्षक विद्यालयात उपलब्ध आहेत. मुलींच्या आरोग्या संदर्भात साप्ताहिक आरोग्य तपासणी, तीन महिन्यांना रक्त तपासणी केली जाते. (प्रतिनिधी)मोफत दिल्या जाणार्‍या सुविधांबरोबरच मुलींना दरमाह विद्यावेतनही दिल्या जाते. जिल्ह्यातील वंचित व दुर्बल घटकातील शाळाबाह्य मुलींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी या विद्यालयात उपलब्ध करुन दिली आहे. या विद्यालयातील प्रवेशासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किंवा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डुंबरे यांनी केले आहे.