शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालय परिसरात अस्वच्छता

By admin | Updated: May 13, 2014 01:01 IST

सेलू : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सेलू : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच प्रसूती, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात ये-जा सुरु असते. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. काटेरी झुडपे व टाकाऊ वस्तू सर्वत्र पसरल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. रुग्णालयातील सकाळच्या वेळी बाह्यरुग्ण विभाग सुरु असतो. त्यामुळे शहरातील महिला रुग्ण उपचारासाठी येतात. या कक्षाच्या परिसरातच अस्वच्छता आहे. दोन वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, या वृक्षांचे संवर्धन न झाल्यामुळे हा परिसर उजाड झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यांच्या निवासाची सोय नाही. तसेच आसनव्यवस्था देखील नाही. (प्रतिनिधी) तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव उपजिल्हा रुग्णालयात नेहमीच वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त राहत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर केवळ प्राथमिक उपचार करुन परभणी येथे पाठविले जाते. दुर्देवाने अपघात घडल्यास जखमींची संख्या अधिक असल्यास वैद्यकीय अधिकारी अपुरे पडतात. अधिकार्‍यांची रिक्त पदे व परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आले आहे.