शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय उपचार व जागरूक पालकांमुळे ‘ती’चा झाला ‘तो’

By admin | Updated: December 28, 2015 23:47 IST

औरंगाबाद : लहानपणापासून मुलगी म्हणून वाढविले, मुलीचे कपडे घातले, नावही मुलीचे; परंतु त्यांना मुलीप्रमाणे न राहता मुलांसारखे राहण्याची,

औरंगाबाद : लहानपणापासून मुलगी म्हणून वाढविले, मुलीचे कपडे घातले, नावही मुलीचे; परंतु त्यांना मुलीप्रमाणे न राहता मुलांसारखे राहण्याची, त्यांच्याप्रमाणे कपडे घालण्याची अन् क्रिकेट खेळण्याची ओढ. आपल्या चिमुकल्यांची होणारी घुसमट, भावना आणि शारीरिक अवस्था वेळीच ओळखून जागरूक पालकांनी त्यांना नवीन आयुष्य दिले. आज अनेक ‘ती’चा ‘तो’ तर अनेक ‘तो’चा ‘ती’ झाले असून, सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहेत.पेडियाट्रिक सर्जन डॉ. संदीप हंबर्डे यांनी तसेच काही चिमुकल्यांनी आणि त्यांच्या पालकांनी यासंदर्भात सोमवारी पत्रकार परिषदेत संवाद साधला. इंटरसेक्स डिसआॅर्डर किंवा डिसआॅर्डर आॅफ सेक्स्युअल डिफरेंटशन या व्यंगामध्ये जन्म घेतलेल्या चिमुकल्यांच्या बाबतीत मुलगा की, मुलगी असा लिंगसंभ्रम निर्माण होतो. प्रकारात शारीरिक व्यंग, वेगळ्या भावना, हालचाली जाणवत असल्याने मुलगा म्हणावे की मुलगी, असा पेच पालकांना पडतो, समाजाचा विचार करून अथवा भीतिपोटी हा आजही वैद्यकीय क्षेत्रातील दुर्लक्षित भाग आहे. कित्येक रुग्ण याबाबत डॉक्टरांकडून सल्ला घेतात; परंतु प्रत्यक्षात उपचार घेत नाहीत. हा आजार जन्मजात व्यंग असून, त्याची योग्य पद्धतीने माहिती व उपचार घेतल्यास सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगता येते. त्यासाठी वैद्यकीय उपचाराबरोबर कौटुंबिक आणि सामाजिक मदतीचा हात मिळण्याची गरज आहे. आपल्या मुलांच्या बाबतीत अशा प्रकारची समस्या वेळीच ओळखून अनेक पालकांनी त्यांना वेळीच सावरले आहे. २० जणांवर शस्त्रक्रियागेल्या तीन वर्षांत शहरात २० चिमुकल्यांवर अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत. शस्त्रक्रियेपूर्वी अनेकांनी मुलांना १२ वर्षांपर्यंत मुलगी म्हणून वाढविले; परंतु वेळीच परिस्थिती लक्षात आल्याने ही मुले आज इतर मुलांसारखे जीवन जगू लागले आहेत. सुरुवातीपासून मुलगी अथवा मुलगा म्हणून वाढविल्यानंतर हजेरीपटापासून सर्व कागदपत्रांवर त्याचप्रमाणे नाव नोंदवलेले असते. शस्त्रक्रियेनंतर नावात बदल करण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. हा त्रास कमी होण्याची गरज आहे.