शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाला मिळाली २० हजार पुस्तकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 19:58 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाला रायगड जिल्ह्यातील हिंदूस्थान आॅर्गेनिक केमिकल्स  कंपनीने २० हजार पुस्तके भेट दिली आहेत.

ठळक मुद्देरायगड जिल्ह्यातील रसायनी येथे १९६२ साली स्थापन झालेल्या आॅर्गेनिक केमिकल्स ही रसायनशास्त्रातील नामांकित कंपनी आहे. रसायनशास्त्रासह विज्ञान, पर्यावरण, संगणक, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आदी विषयांमधील दुर्मिळ पुस्तके या कं पनीच्या संग्रहात होती.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाला रायगड जिल्ह्यातील हिंदूस्थान आॅर्गेनिक केमिकल्स  कंपनीने २० हजार पुस्तके भेट दिली आहेत. अतिशय दुर्मिळ असा ठेवा असलेली ही पुस्तके शुक्रवारीच विद्यापीठात दाखल झाली. यात विज्ञान, पर्यावरण, संगणक, रसायनशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांच्या समावेशामुळे विद्यापीठाचे समृद्ध ग्रंथालय अधिक समृद्ध होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील रसायनी येथे १९६२ साली स्थापन झालेल्या आॅर्गेनिक केमिकल्स ही रसायनशास्त्रातील नामांकित कंपनी आहे. रसायनशास्त्रासह विज्ञान, पर्यावरण, संगणक, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आदी विषयांमधील दुर्मिळ पुस्तके या कं पनीच्या संग्रहात होती. ही कंपनी स्थलांतरीत होणार असल्यामुळे कंपनीने त्यांचे सर्व ग्रंथालयच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहे. या ग्रंथालयात तब्बल २० हजार पुस्तके आहेत. या पुस्तकांसोबतच असलेले फर्निचरही विद्यापीठाला दिले आहे. यातील काही पुस्तके विद्यापीठात दाखल झाली आहेत. तर उर्वरित पुस्तके आणि फर्निचर शनिवारी विद्यापीठात दाखल होणार असल्याचे ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी सांगितले. कंपनीने विद्यापीठाला भेट दिलेल्या पुस्तकांची किंमत ही ६९ लाख रूपये एवढी आहे. या दुर्मिळ पुस्तकांमुळे विद्यापीठाच्या समृद्ध ग्रंथालयाच्या समृद्धीत आणखी भर पडणार आहे. या पुस्तकांचा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार असल्याचे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी स्पष्ट केले.

४५ हजार पुस्तकांमुळे ग्रंथालय बनले होते समृद्ध हैदराबाद संस्थानात उद्योगमंत्री असलेले राजे शामराज राजरायन बहाद्दूर यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाला तब्बल ४५ हजार पुस्तके भेट म्हणून दिले होते. यातील तब्बल ३ हजार ग्रंथ १६५० ते १८०० या कालखंडातील आहेत. या दुर्मिळ ग्रंथांची भर पडल्यामुळेच विद्यापीठाचे हे ग्रंथालय समृद्ध बनले होते. यानंतरही अनेकांनी ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली आहेत. मात्र राजे शामराज यांच्यानंतर २० हजार ग्रंथ भेट देणारी हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल्स ही दुसरीच कं पनी असल्याचे डॉ. धर्मराज वीर यांनी सांगितले. 

सर्व पुस्तकांचे डिझिटलायझेशन केले जाणारविद्यापीठाला भेट मिळालेल्या २० हजार पुस्तकांमधील अनेक पुस्तक  ही आयएसओ स्टॅर्डडची आहेत. ही अतिशय दुर्मिळ पुस्तके असल्यामुळे बाजारात उपलब्ध नाहीत. या पुस्तकांचे जतन करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत मिळालेल्या सर्व पुस्तकांचे डिझिटलायझेशन केले जाणार आहे.- डॉ. धर्मराज वीर, ग्रंथपाल, विद्यापीठ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद