शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. हायस्कूलमध्ये शिक्षकांची वानवा

By admin | Updated: July 19, 2014 00:44 IST

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे जि.प.शाळेत ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे ज्ञानार्जानावर परिणाम होत आहे.

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे जि.प.शाळेत ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे ज्ञानार्जानावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर लिपिकाची कामेही शिक्षकांनाच करावी लागत आहेत. बऱ्याच वर्षांपासून रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत. क्रीडाशिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना खेळ असतात की नाही असा प्रश्न पडला आहे. शाळेत एकूण ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी अवघे २५ पदे भरलेली आहेत. पैकी १२ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. यात रिक्तपदांपैकी उप मुख्याध्यापक १, पर्यवेक्षक १, माध्यमिक शिक्षक कला ४ पदे प्राथमिक शिक्षक २ पदे विशेष शिक्षक कला १ पद, क्रीडा शिक्षक २ पदे, कनिष्ठ सहाय्यक १ पद मिळून १२ पदांचा कारभार इतर शिक्षकांना सांभाळावा लागत आहे.परिणामी शिक्षकांसमोर अनेक अडचणी आहेत. रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे.त्यातच १२ रिक्त जागांमुळे लिपिकाचे काम शिक्षकांवर अवलंबून आहे. पगारी बिले व टपाली कामात पूर्ण दिवस जातो. सर्व कार्यालयीन कामे शिक्षकांवर आहे. विशेष म्हणजे सध्या कार्यरत २५ कर्मचारी आहेत. १५ ते १६ कर्मचारी बुलडाणा येथून अप- डाऊन करतात नियमानुसार मुख्यालयी न थांबता दररोज परगावाहून ये- जा करीत असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत असल्याचा आरोप पालकांतून होत आहे. (वार्ताहर)जागा भरण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकिरा आहेर यांनी सांगितले, रिक्त जागेचा तपशील नेहमी वरिष्ठांना कळविण्या येतो. ते केवळ आश्वासन देतात परंतु कधीच जागा भरल्या जात नाही. बऱ्याच वेळेस शाळेस कुलूप ठोकले. लेखी आश्वासने दिलीत, परंतु शिक्षक मात्र मिळाले नाहीत. मुख्याध्यापक चिंचोले म्हणाले, शाळेत पदभार स्वीकारल्यापासून गुणवत्ता सुधारली परंतु रिक्त जागा ही नेहमी डोकेदुखी ठरत आहे. लिपिकाचे कामे नाईलाजाने शिक्षकांवर करण्याची पाळी येते. क्रीडाशिक्षक व लिपिकाची पदे शाळेला महत्वाचे आहे. मात्र ही पदे न भरल्याने शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी होईल. सर्व पदे शासनाने भरावीत. पालक सांडू ठोकणे म्हणाले, आमची मुल या ठिकाणी शिकतात. येथे सेमी इंग्रजी वर्ग असली तरी येथील तासीका होत नाही. विज्ञानच्या शिक्षकांना कारकुनाचे कामे करावे लागते. नियमित तासिका घेऊन शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. रिक्त पदे भरण्याबाबत तत्परता दाखवावी अशी अपेक्षा होत आहे.