दूरध्वनीच्या वायरिंगमुळे झाडे नष्ट

By Admin | Updated: May 26, 2014 00:56 IST2014-05-26T00:36:21+5:302014-05-26T00:56:36+5:30

हट्टा : परिसरात शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत गतवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे करून रोपे लावण्यात आली होती.

Destroy plants due to telephone wiring | दूरध्वनीच्या वायरिंगमुळे झाडे नष्ट

दूरध्वनीच्या वायरिंगमुळे झाडे नष्ट

हट्टा : परिसरात शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत गतवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे करून रोपे लावण्यात आली होती. मात्र मुख्य रस्त्यालगत लावलेली ही रोपे बीएसएनएल दूरध्वनीच्या वायरिंगसाठी खोदकाम झाल्याने नष्ट झाली आहेत. शतकोटी वृक्षलागवड योजना मोठ्या प्रमाणात राबविली होती. हिंगोली जिल्ह्यातील अनेक ग्रा.पं.ना झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले. त्याची अनेक ग्रा.पं. नी पूर्तता करून झाडे जोपासण्याचे कामही मोठ्या प्रमाणात करण्यात आले; परंतु मुख्य रस्त्याच्या कडेला अनेक खड्डे करून शतकोटी वृक्षलागवडीचे झाडे लावण्यात आली. त्यातील अनेक झाडे मोठीही झाली होती; परंतु काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्याच्या बाजूला दूरध्वनीचे वायर टाकण्याचे काम चालू असून ते काम जेसीबी मशीनद्वारे खोदकाम होत आहे. या रस्त्याच्या बाजुला लावलेली शतकोटी वृक्षलागवड योजनेची अनेक झाडे नामशेष झाली आहेत. दरवर्षी शासन शतकोटी वृक्षलागवड योजनेसाठी लाखो रुपये खर्च करून योजना राबवत आहे. दुसरीकडे या योजनेचा फज्जा उडत असून वायरिंगसाठी झाडे झाली आहेत. (वार्ताहर)

Web Title: Destroy plants due to telephone wiring