ग्राहक सरंक्षण समिती रद्द

By Admin | Updated: June 19, 2014 00:21 IST2014-06-18T23:52:05+5:302014-06-19T00:21:07+5:30

उस्मानाबाद : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १९ आॅक्टोबर २०१३ रोजी स्थापन केलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या.

Customer Protection Committee cancels | ग्राहक सरंक्षण समिती रद्द

ग्राहक सरंक्षण समिती रद्द

उस्मानाबाद : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १९ आॅक्टोबर २०१३ रोजी स्थापन केलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असून, पुरवठा विभागाकडून आता नव्याने समित्या स्थापन करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
ग्राहकांच्या समस्यांचे निवारण होण्याच्या दुष्टीने जिल्हा पुरवठा विभागाअंतर्गत जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात येते. परंतु, न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या १९ आॅक्टोबर २०१३ पूर्वीच्या २८ सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असृून, नवीन परिषदेसाठी प्रस्तावही मागविण्यात येत आहेत. यात जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषद सदस्य, पंचायत समिती, कृषी बाजार समितीचे सदस्य, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, शाळा-महाविद्यालयाचे प्रतिनिधी, व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे. नवीन परिषद ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी करावी असे शासनाचे आदेश आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदावर विहित कालमर्यादेत अशासकीय सदस्यांची नियुक्ती न झाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्यास त्यास जिल्हाधिकारी, नियंत्रक , शिधावाटप व संचालक हे जबाबदार राहणार आहेत. परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्यत्या करताना उच्च न्यायालयाच्या २५ एप्रिल २०१४ च्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

Web Title: Customer Protection Committee cancels