शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टीचालकांविरुद्धपोलिसांत गुन्हे दाखल

By admin | Updated: May 24, 2014 00:42 IST

पाथरी : शहरातील ६२ वीटभट्टीधारकांकडे ३१ मार्चअखेर १५ लाख रुपये गौण खनिजाची रक्कम येणे बाकी होते. रक्कम भरली नाही या कारणावरून सर्वच वीटभट्टी चालकांविरुद्ध गुन्हे

पाथरी : शहरातील ६२ वीटभट्टीधारकांकडे ३१ मार्चअखेर १५ लाख रुपये गौण खनिजाची रक्कम येणे बाकी होते. रक्कम भरली नाही या कारणावरून सर्वच वीटभट्टी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर २६ जणांविरुद्ध पाथरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाथरी शहरात महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार ६२ वीटभट्टींचे व्यवसाय चालू आहेत. यापूर्वी महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे परवाना न घेता वीटभट्टी व्यवसाय चालत होता. तसेच यासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची चोरी करून वीटभट्टी व्यवसायासाठी वापरली जायची. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या आदेशानुसार पाथरी शहरातील वीटभट्टीचा व्यवसाय करणार्‍या वीटभट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर दुसर्‍या तालुक्याकडून फेरतपासणी करण्यात आली. ५०० रुपये परवाना फीस घेऊन ६२ वीटभट्टीधारकांना महसूल विभागाने परवाने दिले. ३१ मार्च २०१४ अखेर या सर्व वीटभट्टीधारकांकडे जवळपास १५ लाख रुपये गौण खनिजाची रक्कम येणे अपेक्षित होते. याबाबत संबंधितांना नोटिसाही देण्यात आल्या. तरीही गौण खनिजाची रक्कम भरण्यात न आल्यामुळे ६२ वीटभट्टीचालकांविरुद्ध पोलिस कारवाई करण्याबाबतचे आदेश दोन महिन्यांपूर्वी पाथरी तहसीलदारांनी मंडळ अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंंतर ही कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)दरम्यानच्या काळात याबाबत कारवाई न झाल्याने संबंधित मंडळ अधिकार्‍याच्या विरोधातच कारवाई करण्याबाबतचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केला होता. त्यानंतर मंडळ अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरून २६ वीटभट्टीचालकांविरुद्ध पाथरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाकडून स्वतंत्र वीटभट्टीचालकांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची माहिती तहसीलदार देवीदास गाडे यांनी दिली.