शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच होणार शहराबाहेर मतमोजणी

By admin | Updated: May 12, 2014 00:40 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. मतमोजणीसाठी अवघे शंभर तास उरले असून, प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे.

 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. मतमोजणीसाठी अवघे शंभर तास उरले असून, प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. मोजणीच्या ठिकाणी डाटा एंट्रीचे काम अचूक व्हावे याकरिता विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शिवाय मोजणी करणार्‍या कर्मचार्‍यांना त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दरम्यान, लोकसभेच्या निमित्ताने औरंगाबादेत यावेळी पहिल्यांदाच शहराबाहेर मतमोजणी होत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी १६ मे रोजी शेंद्रा एमआयडीसीत होणार आहे. चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या या मतमोजणीसाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीशी संबंधित आकडेवारी अचूक नोंदविल्या जावी यावर निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. मतमोजणीच्या ठिकाणीच डाटा एंट्रीची व्यवस्था केली आहे. आकडेवारी अचूक आणि आयोगाने ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार नोंदविली जाण्यासाठी सध्या या कामाचा सराव सुरू आहे. मतदानस्थळी डाटा एंट्रीसाठी एकूण १२ कॉम्प्युटर, १२ प्रिंटर आणि ६ झेरॉक्स मशीन असणार आहेत. डाटा एंट्रीच्या प्रक्रियेची रंगीत तालीम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. मतमोजणी केंद्रात जाण्यापूर्वी झडती मतमोजणी केंद्रात मोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच उमेदवार आणि त्यांचे मोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश असणार आहे. मात्र, मोजणी केंद्रांत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाची झडती घेतली जाणार आहे. मोजणी केंद्रात कुणालाही पान, तंबाखू, गुटखा, सिगारेट यासारख्या वस्तू नेता येणार नाहीत. झडतीत या सर्व गोष्टींची तपासणी केली जाईल. तसेच कुणालाही आत मोबाईल घेऊन जाता येणार नाही. केवळ केंद्रीय निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर काही वरिष्ठ अधिकार्‍यांनाच मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी असेल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. मतमोजणी शेंद्रा एमआयडीसीत प्रशासनाने यावेळी लोकसभेची मतमोजणी शेंद्रा एमआयडीसीतील बी-२२ येथे ठेवली आहे. आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी शहरातील शासकीय कला महाविद्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात होत होती. यावेळी पहिल्यांदाच ही मतमोजणी शहराबाहेर तब्बल २४ किलोमीटर अंतरावर ठेवली आहे. शहरात मतमोजणी केंद्रांवर नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी ओसंडून वाहत असे. मात्र, आता मतमोजणी केंद्र इतके दूर असल्यामुळे यावेळी ही गर्दीही ओसरण्याची शक्यता आहे.