CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादेत दिवसभरात २१ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १३० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 20:38 IST2020-04-29T20:37:28+5:302020-04-29T20:38:23+5:30

आसेफिया कॉलनीतील दोघांचा अहवाल रात्री पॉझिटिव्ह

CoronaVirus: Worrying! 21corona positives in Aurangabad in a day; The number of patients is over 130 | CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादेत दिवसभरात २१ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १३० वर

CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादेत दिवसभरात २१ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १३० वर

ठळक मुद्दे१८ वर्षीय तरुण आणि २५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह

औरंगाबाद : शहरात बुधवारी रात्री आणखी २ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३० झाली. आसेफिया कॉलनीतील दोघांचा अहवाल रात्री पॉझिटिव्ह आला. यात एका १८ वर्षीय तरुण आणि २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे, असे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.


दरम्यान, शहरात कोरोनाग्रस्तांची वाढ वेगाने होत आहे. बुधवारी दुपारपर्यंत १९ नवीन रुग्णांची भर पडली होती. कोरोना बाधितांच्या संपर्कातील रुग्णात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यात नवीन हॉटस्पॉटची भर पडत असल्याने शहर समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर आले आहे. बुधवारी सकाळी नूर कॉलनी ११, गारखेडा १ व भीमनगर १ अशी रुग्ण संख्या वाढली आहे. यात गारखेडा या नव्या हॉटस्पॉटची भर पडली आहे. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

Web Title: CoronaVirus: Worrying! 21corona positives in Aurangabad in a day; The number of patients is over 130