CoronaVirus : कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र; पुढचे दोन दिवस औरंगाबादचा ग्रामीण भाग राहणार पूर्णपणे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 17:36 IST2020-04-29T17:36:16+5:302020-04-29T17:36:50+5:30
यानुसार ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे

CoronaVirus : कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र; पुढचे दोन दिवस औरंगाबादचा ग्रामीण भाग राहणार पूर्णपणे बंद
खुलताबाद : ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत. यानुसार ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती खुलताबाद पोलीस ठाण्याचे निरिक्षक सीताराम मेहत्रे यांनी दिली.
औरंगाबाद ग्रामीण मधील अनेक गावांना कोरोनाबाबत खबरदारी घेतली आहे. दौलताबाद व कसाबखेडा येथील कोरोनो रूग्ण सापडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वावरण निर्माण झाले असून अनेक गावक-यांनी गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर- भांडेगाव ग्रामस्थांनी तर आजपासूनच बंद पाळला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील लोक आता सतर्क झाले आहेत. गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कडक कारवाई करतील. तरी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.