CoronaVirus...आणि कोरोनामुक्त मातेने प्रथमच चिमुकलीला डोळे भरून पाहिले; प्रसूतीनंतर १० दिवसांनी झाली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:18 IST2020-04-29T15:04:45+5:302020-04-29T15:18:00+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात गत आठवड्यात १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिजर प्रसूती यशस्वी झाली होती.

CoronaVirus ... and baby rested in the corona-free mother's hand; The visit took place 10 days after birth | CoronaVirus...आणि कोरोनामुक्त मातेने प्रथमच चिमुकलीला डोळे भरून पाहिले; प्रसूतीनंतर १० दिवसांनी झाली भेट

CoronaVirus...आणि कोरोनामुक्त मातेने प्रथमच चिमुकलीला डोळे भरून पाहिले; प्रसूतीनंतर १० दिवसांनी झाली भेट

ठळक मुद्देजन्मानंतर पहिल्यांदाच आईने मुलीला नजरभरून पाहिले


- संतोष हिरेमठ

औरंगाबाद: बायजीपुरा येथील कोरोनामुक्त आई आणि नवजात मुलीची अखेर बुधवारी भेट झाली. जन्मानंतर पहिल्यांदाच आईने आपल्या मुलीला नजरभरून पाहिले.

जिल्हा रुग्णालयात दाखल ही महिला आता कोरोनामुक्त झाली आहे. तिला बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी तिच्याकडे तिची नवजात मुलगी वडिलांकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती नागरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. पद्मा बकाल आदी उपस्थित होते. 
जिल्हा सामान्य रुग्णालयात गत आठवड्यात १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिजर प्रसूती यशस्वी झाली हिती. या महिलेने मुलगी झाली. या तपासणीतून ही नवजात मुलगी कोरानामुक्त असल्याचे निदान झाले होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून मुलीला जन्मल्यानंतर आईपासून दूर ठेवले. तेव्हापासून डॉक्टर, परिचारिका या बाळाचा सांभाळ करीत होते. अखेर सदर महिलेचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने या आईची आणि मुलीची भेट होण्याचाही मार्ग अखेर मोकळा झाला होता.

Web Title: CoronaVirus ... and baby rested in the corona-free mother's hand; The visit took place 10 days after birth