CoronaVirus : औरंगाबादेत आणखी ८ पॉझिटिव्ह ; दुपारपर्यंत १९ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या १२८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:34 IST2020-04-29T14:33:44+5:302020-04-29T14:34:17+5:30

औरंगाबादेतील कोरोनाबाधीतांची १२८ झाली.आहे. असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगीतले.

CoronaVirus: 8 more positive in Aurangabad; As of noon, 19 corona cases, total 128 patients | CoronaVirus : औरंगाबादेत आणखी ८ पॉझिटिव्ह ; दुपारपर्यंत १९ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या १२८ वर

CoronaVirus : औरंगाबादेत आणखी ८ पॉझिटिव्ह ; दुपारपर्यंत १९ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या १२८ वर

औरंगाबाद : औरंगाबादेत बुधवारी सकाळी ११ आणि दुपारी आणखी ८ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधीतांची १२८ झाली.आहे. असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगीतले.

८ नव्या रुग्णांत नुर कॉलनीत ३ आसिफिया कॉलनीत ३ आणि किल्ले अर्क येथे २ जणांचा समावेश आहे. शहरात कोरोनाग्रस्तांची वाढ वेगाने होत आहे. बुधवारी सकाळी ११ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात नूर कॉलनी ११, गारखेडा १ व भीमनगर १ अशी रुग्ण संख्या असल्याची माहिती डॉ.येळीकर यांनी दिली.यासोबतच शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १२० वर गेली आहे.


कोरोना बाधितांच्या संपर्कातील रुग्णात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यात नवीन हॉटस्पॉटची भर पडत असल्याने शहर समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर आले आहे. बुधवारी सकाळी नूर कॉलनी ११, गारखेडा १ व भीमनगर १ अशी रुग्ण संख्या वाढली आहे. यात गारखेडा या नव्या हॉटस्पॉटची भर पडली आहे. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

Web Title: CoronaVirus: 8 more positive in Aurangabad; As of noon, 19 corona cases, total 128 patients