CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी ४ जण पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:23 IST2020-04-13T13:23:12+5:302020-04-13T13:23:44+5:30

यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील हे चारही लोक आहेत

CoronaVirus: 4 more positive in Aurangabad; 24 Number of corona patients in city | CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी ४ जण पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २४

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी ४ जण पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २४

औरंगाबाद : औरंगाबादेत शहरात आज आणखी 4 कोरोना रुग्णांची भर पडली.यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील हे चारही लोक आहेत.यामध्ये एका अकरा वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली. यासोबतच शहरात कोरोना बाधितांची संख्या २४ वर गेल्याने शहरवासीयांची चिंतेत अधिक भर पडली आहे.

मागील ४८ तासात शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. यामुळे आरोग्ययंत्रणा आणि शहरवासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र आज सकाळी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील काही संशयितांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात किराडपुरा येथील दोघांचा, आरेफ कॉलनी आणि देवळाई परिसरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यात एक लहान मुलगी, दोन महिला आणि एक पुरुष असल्याची माहिती आहे.

Web Title: CoronaVirus: 4 more positive in Aurangabad; 24 Number of corona patients in city