शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पैठण रोडचे काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:09 IST

महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंत या २ कि़मी. अंतरातील काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंत या २ कि़मी. अंतरातील काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने तयारी सुरू केली आहे. एका दिशेचा रोड वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाहनकोंडीचा त्रास थोडा कमी झाला आहे.महानुभाव आश्रम ते लिंक रोड या पैठण रोडवरील दोन कि़मी.च्या कामामुळे नागरिकांना मागील काही महिन्यांपासून प्रचंड त्रास सहन करून शहरात ये-जा करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या रोडचे काम करण्यात येत आहे. एका बाजूचे काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. पुलावरील स्लॅबचे काम अजून बाकी आहे. कंत्राटदार जीएनआयने लिंक रोड ते महानुभाव आश्रम पोलीस चौकीपर्यंत दुसºया बाजूचा रोड खोदला असून, त्यावर दबाईचे काम सध्या सुरू आहे. रोड खोदताना जलवाहिनी, ड्रेनेज वाहिन्या दबल्या होत्या. त्यामुळे मध्यंतरी नागरिकांची कुचंबणा झाली होती.अभियंता म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, आॅक्टोबर अखेरपर्यंत दोन्ही बाजूचे काँक्रीट पूर्ण होईल. नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात डांबरी रोड व साइडड्रेन व इतर कामे पूर्ण होतील. १५ नोव्हेंबरपासून रोड वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला होईल. पुलाच्या स्लॅबचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.चार महिन्यांपासून त्या रोडचे काम सुरू आहे. आधुनिक मशिनरीच्या साह्याने काम सुरू असतानाही पैशांअभावी ते काम रखडले होते. आता शासनाने त्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.