शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

समिती म्हणते, पैशाशिवाय मोल कळणार नाही

By admin | Updated: May 27, 2014 00:58 IST

उस्मानाबाद: श्री तुळजा भवानी जिल्हा स्टेडियम समितीने क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी वयोवृध्दांपासून विविध खेळ, खेळाडूंसाठी फीस आकारणीचा निर्णय घेतला आहे़

 उस्मानाबाद: श्री तुळजा भवानी जिल्हा स्टेडियम समितीने क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी वयोवृध्दांपासून विविध खेळ, खेळाडूंसाठी फीस आकारणीचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, ‘लोकमत’ने समितीच्या धोरणा याबाबत माहिती घेतली़ शासनाकडून निधी मिळत नसल्याने देखभाल-दुरूस्तीसाठी निधी उपलब्धता करण्यासह पैसे भरल्याशिवाय स्टेडियमचे मोल समजणार नाही ही भूमिका समितीची असल्याचे दिसून आले़ राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने डिसेंबर २०१२ रोजी परिपत्रक काढून क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी स्वयंपूर्ण निधी उपलब्ध करण्याबाबत आदेशित केले आहे़ प्रारंभीचे तीन वर्षे क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरूस्तीसाठी निधी पुरविण्यात आला़ काही निधी येणे बाकी आहे़ त्यामुळे श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमच्या देखभाल-दुरूस्तीसाठी समितीने फीस आकारण्याचा निर्णय घेतला आहे़ शिवाय चार पैसे भरून मैदानात पाऊल ठेवल्यानंतरच मैदानाच्या सुरक्षेसह इतर बाबींचे महत्त्व सर्वांनाच समजेल असे मत स्टेडियम समितीकडून व्यक्त करण्यात आले आहे़ स्टेडियमच्या देखभाल दुरूस्तीसाठी जवळपास १ लाख २२ हजारांचा खर्च समितीला अपेक्षित आहे़ तर खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व इतर माध्यमातून मासिक ५० हजार ५०० रूपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे़ उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने लवकरच स्विमिंग पूलसह इतर क्रीडांगणे चांगल्या दर्जाची करून त्याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) अशी राहणार फी वॉकिंग ट्रॅकसाठी प्रत्येकी ५० रूपये, स्केटींग रिंगसाठी प्रत्येकी १०० रूपये, फुटबॉलसाठी प्रत्येकी १०० रूपये, जिम हॉलसाठी प्रत्येकी १०० रूपये, पोलिस भरतीचा सराव करणार्‍यांसाठी प्रत्येकी १०० रूपये, बॅडमिंटनसाठी प्रत्येकी १५० रूपये तसेच क्रिकेट स्पिचसाठी १२००० रूपये फीस निश्चित करण्यात आली आहे़ यातून महिन्याला जवळपास ५० हजार ५०० रूपयांचे उत्पन्न समितीला अपेक्षित आहे़ सूचनांवर विचार होईल क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून न देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला असून, समितीने त्यासाठी स्वत: निधी उभारण्याबाबत सांगण्यात आले आहे़ त्यामुळे श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमच्या देखभाल-दुरूस्तीसाठी समितीने फीस आकारण्याचा निर्णय घेतला आहे़ येथे येणार्‍या खेळाडुंसह नागरिकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील़ फीसच्या निर्णयाबाबत अनेक सूचना येत आहेत़ या सूचना वरिष्ठांसमोर मांडून त्यावर आवश्यक तो तोडगा काढण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती क्रीडाधिकारी अनिल देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ यांना मिळणार सवलत क्रीडा समितीने घेतलेल्या निर्णयातून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉलसाठी येणार्‍या खेळाडुंसह मैदानी सराव करणार्‍या शालेय खेळाडूंना सूट देण्यात आली आहे़ या खेळाडूंकडून ओळखपत्रासाठी वार्षिक ५० रूपये आकारण्यात येणार आहेत़ दुरूस्तीसाठी होणारा खर्च क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी समितीला जवळपास १ लाख, २२ हजार रूपये लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यात स्टेशनरीसाठी १५००, साहित्यासाठी १५०० रूपये, तीन मैदान सेवकांच्या मानधनासाठी १८०००, वीज बिलासाठी ४०००० रूपये, सात सुरक्षा रक्षकांच्या मानधनासाठी ४२००० रूपये, एका लिपिकासाठी ७००० रूपये, व्यवस्थापकासाठी १०००० रूपये, झेरॉक्स व इतर किरकोळ खर्चासाठी २००० रूपये अपेक्षित आहेत़