शहराचा विकास आराखडा ‘गुगली’

By Admin | Updated: May 7, 2014 00:14 IST2014-05-07T00:14:27+5:302014-05-07T00:14:56+5:30

औरंगाबाद : महापालिका हद्दीच्या विकास आराखड्यातील विद्यमान जागा वापराचे (ईएलयू) संपत आले असून, पुढील कामाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू होणार असल्याचे वृत्त आहे.

City Development Plan 'Googly' | शहराचा विकास आराखडा ‘गुगली’

शहराचा विकास आराखडा ‘गुगली’

औरंगाबाद : महापालिका हद्दीच्या विकास आराखड्यातील विद्यमान जागा वापराचे (ईएलयू) संपत आले असून, पुढील कामाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. इंटरनेटच्या गुगल मॅपच्या आधारे विद्यमान जागा वापराचा नकाशा अंतिम होत असल्याचे आरोप यंत्रणेवर करण्यात येत आहेत. १९७५, १९९१ आणि २००२ साली विकास आराखड्याचे काम झाले़ आगामी २० वर्षांसाठी नूतन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे़ ग्रीन झोन ‘यलो’ करण्याचा सपाटा काही अधिकारी, राजकारण्यांनी लावला आहे. एजंटाप्रमाणे काही जणांनी कोट्यवधीची ‘सुपारी’ घेऊन नकाशाचे पुडगे स्वत:कडे दाबून ठेवल्याच्या आरोपांनी पालिका वर्तुळात जोर धरला आहे. नगरपालिकेचे १९८२ मध्ये महापालिकेत रूपांतर झाले़ ३० वर्षांत मनपा हद्दीतील लोकसंख्या २ लाखांहून १२ लाखांपर्यंत पोहोचली़ १८ खेड्यांचे केव्हाच शहरात रूपांतर झाले; पण सुविधांचा गाडा मंदावला़ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे ७ कर्मचारी या आराखड्यावर काम करीत आहेत. दीड कोटी रुपये आराखड्याच्या कामासाठी खर्च अपेक्षित आहे़ ९५ लाख रुपयांच्या खर्चास मनपाने मान्यता दिली आहे. भू-वापराची माहिती पुढे यावी मनपा हद्दीतील जागा कशासाठी वापरली गेली आहे. त्याचे निकष व यापूर्वीच्या तीन आराखड्यांमधील भू-आरक्षणाची माहिती समोर यावी, अशी मागणी नगरसेवक समीर राजूरकर यांनी केली आहे. काय असेल आराखड्यात? मनपा हद्दीतील ग्रीन, यलो झोन शोधणे, २०३२ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येसाठी रस्ते, शाळा, क्रीडांगणे, रुग्णालये, स्मशानभूमीसाठी आरक्षण टाकणे. वॉर्डांच्या संख्येचे समीकरण तयार करणे.

Web Title: City Development Plan 'Googly'