शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारानंतर छ. संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; मुख्य आरोपी पवन दिवेकरसह ८ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:39 IST

मिरवणुकीतील वादातून गँगवॉर : अटकेनंतर सर्वांचा ठाण्यात यथेच्छ ‘पाहुणचार’, संपूर्ण टोळीवर गंभीर कारवाईसाठी पोलिसांकडून तयारी सुरू

छत्रपती संभाजीनगर : हनुमानगरमधील गोळीबारानंतर पोलिसांच्या भीतीने शहरात लपण्यासाठी जागा शोधणाऱ्या पवन दिवेकर व नीलेश ऊर्फ सूर्या नारायण रांजणे (रा. न्यायनगर) यांच्यासह आठजणांच्या पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यात रांजणेनेही गोळीबार केल्याचा दावा विरोधी गटाने केला. पोलिसांनी मात्र याचा इन्कार केला. १४ एप्रिल रोजी मिरवणुकीतील छायाचित्र झळकल्यानंतर उफाळून आलेला वादच गोळीबारापर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

काही दिवसांपासून लृटमार, प्राणघातक हल्ले, पिस्तुलाद्वारे दहशत माजवण्याच्या घटनांनी शहर हादरत आहे. एपीआय कॉर्नर परिसरात एका तरुणाला भाेसकून लुटण्यात आले. ७२ तासांत सातपेक्षा अधिक महिलांना लुटण्यात आले. त्याशिवाय, हर्सूलमध्ये एका गुन्हेगाराने पिस्तुलाने दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. वाळूजमध्ये मुलीच्या गळ्याला चाकू लावून लूट झाली. त्यातच गुरुवारी हनुमाननगरमध्ये भर वसाहतीमध्ये गोळीबाराच्या घटनेने शहर पुन्हा थरारले.

जयंती मिरवणुकीतील वाद गोळीबारापर्यंत१४ रोजी पुंडलिकनगरमध्येे मिरवणुकीत दिवेकरचे छायाचित्र झळकल्याने वाद झाला. त्यातून दिवेकरचा मामेभाऊ कुणाल साळवे (२६, रा. न्यायनगर) याला रांजणेच्या टोळीने झेंड्याच्या रॉडने मारले. दोन दिवस धुसफूस सुरू असताना दिवेकर, रांजणेने गुरुवारी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. त्यात गोळी झाडली गेली.पुंडलिकनगर पोलिसांनी कुणाल साळवेच्या तक्रारीवरून नीलेश रांजणे, आदित्य दाभाडे, आकाश साळुंखे, अमोल साळुंखे, ओंकार गिरीसह अन्य दोघांवर, तर रांजणेच्या तक्रारीवरून दिवेकर, कुणाल साळवे, रोहन दिवेकर, सिद्धार्थ चाबूकस्वार, सतीश हिवराळे यांच्यावर गुन्हे दाखल केले.

यांच्या आवळल्या मुसक्यापवन दिवेकर, कुणाल साळवे, महेश गौतम साळवे (३०, रा. संसारनगर), रोहन दिवेकर (२४, रा.एमएसईबी कर्मचारी वसाहत, मिल कॉर्नर), सतीश हिवराळे (२३, समतानगर), सिद्धार्थ चाबूकस्वार (२१, रा. न्यायनगर, गारखेडा), रांजणे व आकाश साळुंखे (रा. हनुमाननगर).

पहाटे ५ वाजता चहा पिताना सापडलागोळीबारानंतर दिवेकर पोलिसांना घाबरून शहरातील विविध भागांत लपण्यासाठी जागा शोधत होता. भावसिंगपुरा, पडेगाव, मिटमिट्यात त्याने लपण्याचा प्रयत्न केला. मोबाईल सुरू बंद करत होता. पहाटे ५ वाजता पोलिसांनी त्याचा एका साथीदार व मामेभावाला पकडले. त्यांच्याकडून पवन पैठण गेटला असल्याचे कळाले. फौजदार अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, अंमलदार प्रकाश डोंगरे, संदीप बीडकर, अजय कांबळे यांनी धाव घेतली. पोलिसांना पाहताच दिवेकर पळत सुटला. पाठलागात पडून राऊत पाय मोडून जखमी झाले. तरीही पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. अटकेनंतर सर्वांचा ठाण्यात यथेच्छ ‘पाहुणचार’ झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Police Act: Main Suspect, Eight Arrested After Shooting

Web Summary : Following a shooting in Hanumannagar, police arrested Pawan Diwekar and seven others. A dispute stemming from a procession photo led to the violence. The city has seen a rise in crimes like robbery and assault. Police caught Diwekar near Paithan Gate after a chase.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस