छत्रपती संभाजीनगर : “लाइट्स… कॅमेरा… ॲक्शन !” या आवाजाने आता शहरातील वातावरणच बदलले आहे. जणू काही संपूर्ण शहरच एक ‘आउटडोअर शूट डेस्टिनेशनच’ बनले आहे. ऐतिहासिक वास्तू, निसर्गाचा देखणा कॅनव्हास आणि विविध लोकेशन्समुळे येथे चित्रपट, वेब सिरीज आणि जाहिरातींचे शूटिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सगळ्या ‘टेक्स’मधून शहराने १२२ कोटींची कमाई केली आहे. ही कमाई लहान-मोठ्या ३० व्यवसायात विभागल्या गेली आहे.
शूटिंगमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारीशूटिंगमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही ‘सुपरहिट ओपनिंग’ मिळाली आहे. शूटिंगच्या दरम्यान हॉटेल्स ‘हाऊसफुल’, ट्रान्सपोर्ट ‘ऑन रोल’ आणि केटरिंगपासून छोट्या दुकानदारांपर्यंत प्रत्येक जण या ‘फिल्म’चा महत्त्वाचा भाग ठरतो आहे. स्पॉटबॉयपासून पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वांनी या ‘प्रॉडक्शन’मध्ये आपली भूमिका साकारली आहे.
दर महिन्याला चार ते पाच प्रॉडक्शन हाऊसकडून येणाऱ्या चौकशा म्हणजे शहराच्या वाढत्या ‘डिमांड’चा ट्रेलरच. समृद्धी महामार्गामुळे मुंबईशी वाढलेली कनेक्टिव्हिटी, उपलब्ध विमानसेवा आणि कमी गर्दीची ‘फ्रेश लोकेशन्स’ यामुळे संभाजीनगर निर्मात्यांसाठी ‘वन-स्टॉप शूटिंग डेस्टिनेशन’ ठरत आहे.
लोकेशन्सचा ‘मेगा सेट’अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, पानचक्की, विमानतळ-ही ठिकाणे म्हणजे ‘पीरियड फिल्म’साठी रेडीमेड सेटच. तर ग्रामीण भाग, डोंगर-दऱ्या आणि अभयारण्ये ‘ॲडव्हेंचर’ आणि ‘ड्रामा’साठी उत्तम बॅकड्रॉप देतात. एका शहरात इतकी ‘लोकेशन व्हरायटी’ मिळणे हीच संभाजीनगरची खरी ‘यूएसपी’ ठरत आहे.
स्थानिक कलाकारांना ‘स्क्रीन टाइम’शहरात नाट्य आणि कला क्षेत्राची समृद्ध परंपरा आहे. स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांना इथेच संधी मिळाल्यास मुंबईकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. याच ‘प्लॅटफॉर्म’वरून अनेक नव्या ‘स्टार्स’चा जन्म होऊ शकतो.
चार वर्षांचा ‘शूटिंग रिपोर्ट कार्ड’
हिंदी चित्रपट सीन - १८पूर्ण हिंदी चित्रपट - १
पूर्ण मराठी चित्रपट - १पूर्ण वेब सिरीज - १
वेब सिरीज सीन - १५शॉर्ट फिल्म - ८जाहिरात फिल्म - २२
येत्या सप्टेंबर महिन्यापासून आणखी २ हिंदी चित्रपट व १ वेबसिरीजची शहरात शूटिंग होणार आहे.
‘जवान’चा ३० कोटींचा ‘एक्शन सीन’शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील अवघ्या १० मिनिटांच्या सीनसाठी ६०० जणांचे युनिट शहरात दाखल झाले होते. दि. २७ नोव्हेंबर ते दि. १३ डिसेंबर २०२२ या काळात झालेल्या शूटिंगमुळे शहराला तब्बल ३० कोटींचा ‘बिझनेस’ मिळाला-हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘हिट सीन’ ठरला.
‘फिल्म सिटी’ची मागणी ‘हायलाइट’मध्ये“ॲक्शन म्हटले की कॅमेरा आता सरळ संभाजीनगरकडे वळतो,” परिणामी स्थानिक पातळीवर फिल्म सिटी उभारण्याची मागणी जोर धरत आहे. आधुनिक स्टुडिओ, पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांचा ‘फुल पॅकेज’ तयार झाल्यास संभाजीनगर महाराष्ट्राच्या फिल्म मॅपवर ‘लीड रोल’मध्ये झळकू शकते. यासाठी ‘एट अवर्स फिल्म ॲड्ड प्रोडक्शनने’ डॉक्युमेंट्रीही तयार केली असून, लोकप्रतिनिधींमार्फत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.-किशोर निकम, लाइन प्रोड्यूसर, छायाचित्रकार
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar is becoming a shooting hub due to its historic sites and natural beauty, generating ₹122 crore in revenue. Film shoots boost local businesses, from hotels to small shops. Increased connectivity and diverse locations make it a prime destination, attracting filmmakers and artists.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर ऐतिहासिक स्थलों और प्राकृतिक सुंदरता के कारण शूटिंग का केंद्र बन रहा है, जिससे ₹122 करोड़ का राजस्व प्राप्त हुआ है। फिल्म शूटिंग से स्थानीय व्यवसायों को बढ़ावा मिलता है, होटल से लेकर छोटी दुकानों तक। बढ़ी हुई कनेक्टिविटी और विविध स्थान इसे फिल्म निर्माताओं और कलाकारों के लिए एक प्रमुख गंतव्य बनाते हैं।