शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

शेंद्रा परिसराकडे बिल्डर्सचा वाढता ओढा

By admin | Updated: May 8, 2014 00:31 IST

सुनील कच्छवे, साहेबराव हिवराळे , औरंगाबाद औद्योगिक विकासाच्या वेगामुळे शेंद्रा औद्योगिक परिसरात घरांची गरज वाढली आहे.

सुनील कच्छवे, साहेबराव हिवराळे , औरंगाबाद औद्योगिक विकासाच्या वेगामुळे शेंद्रा औद्योगिक परिसरात घरांची गरज वाढली आहे. शिवाय शहराजवळ असल्याने अनेक लोक या भागात गुंतवणूक म्हणून प्लॉटची खरेदी करीत आहेत. म्हणूनच गेल्या काही दिवसांत अनेक बिल्डर्स शेंद्रा परिसराकडे वळले आहेत. औरंगाबादचा विस्तार चारही दिशांनी झपाट्याने होत आहे. त्यातच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर (डीएमआयसी) प्रकल्पामुळे शेंद्रा एमआयडीसी परिसराला आणखी महत्त्व आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एमआयडीसीलगतच्या शेंद्रा जहांगीर, शेंद्रा बन, गंगापूर जहांगीर, वरुड काझी, कुंभेफळ, लाडगाव, करमाड, टोणगाव आणि हिवरा या गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या सर्व गोष्टी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून शहरातील बिल्डर्सही या भागाकडे मोठ्या संख्येने वळले आहेत. क्रेडाईचे अध्यक्ष पापालाल गोयल यांनी सांगितले की, विकासासाठी शेंद्रा परिसरात भरपूर वाव निर्माण झाला आहे. लोकांकडून या भागात प्लॉट आणि घरांना चांगली मागणी आहे. इन्व्हेस्टर क्लासही इकडे वळला आहे. या भागात सध्या वेगवेगळ्या बिल्डर्सचे शंभरपेक्षा जास्त प्रकल्प सुरू आहेत. एनएसाठी चारशे शिफारशी 1 शेंद्रा औद्योगिक परिसराच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अकृषक परवानग्या घेण्यात येत आहेत. निवासी वापरासाठी जमिनीचा वापर करता यावा यासाठी अशी परवानगी आवश्यक असते. 2 ही परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिली जाते. शेंद्रा परिसरातून असे अनेक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत. 3 अकृषक परवाना घेण्यासाठी आधी नगररचना विभागाकडे लेआऊट सादर करावे लागते. हे लेआऊट तपासून नगररचना विभाग अकृषक परवाना देण्यासंदर्भात शिफारस करतो. 4 चालू वर्षी शेंद्रा परिसरातील जमिनींच्या एनएसंदर्भात जवळपास चारशे शिफारशी केल्या असल्याचे नगररचना विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पाण्याचे नियोजन नाही... शहरातील नागरिकांनाच अपुरा पाणीपुरवठा होत असून, पाण्यासाठी सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे. अशा परिस्थितीत तब्बल नऊ गावे विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाचा ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असला तरी मुळात पाणी ही सर्वांत मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ नागरिक लिंबाजी बागल यांनी नमूद केले. भूमिहीन म्हणून विरोध करणार गावातील जमिनी हिरावून घेतल्या जात असून, चांगल्या शेतीयोग्य जमिनींवर कारखाने, घरे उभारण्यात येतील. अख्खे गाव भूमिहीन होणार असल्याने आता शेतकर्‍यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. ९ गावांतील लोकांना एकत्र करून विरोधाचा लढा आम्ही उभारणार असल्याचे सरपंच पंढरीनाथ धाडगे यांनी सांगितले.