४२ वर्षांमध्ये दोनच गावांत बाटली आडवी

By Admin | Updated: December 23, 2015 23:57 IST2015-12-23T23:06:27+5:302015-12-23T23:57:30+5:30

बीड : जिल्हयात १९७३ पासून दारू दुकान परवाने दिले जातात. मागील ४२ वर्षात केवळ दोन गावांची दारू बंदी झाली आहे. यामध्ये काळेगाव हवेली व आडस या गावांचा समावेश आहे

Bottle in two villages in 42 years | ४२ वर्षांमध्ये दोनच गावांत बाटली आडवी

४२ वर्षांमध्ये दोनच गावांत बाटली आडवी


बीड : जिल्हयात १९७३ पासून दारू दुकान परवाने दिले जातात. मागील ४२ वर्षात केवळ दोन गावांची दारू बंदी झाली आहे. यामध्ये काळेगाव हवेली व आडस या गावांचा समावेश आहे. सद्या या दोन्ही ठिकाणी दारू विक्री केली जात असल्याचे चित्र आहे.
पालवण चौकातील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी नारी विकास संघर्ष समितीच्या महिला आक्रमक झाल्या होत्या. यावरून पुन्हा एकदा दारू बंदीचा मुद्द ऐरणीवर आला असून पालवण चौकातील ते दारू दुकान कायद्याच्या चौकटीत बसवून रितसर परवाणगी दिलेली असल्याची भूमीका प्रशासनाची आहे.
नागरी वस्तीमध्ये दारू दुकान सुरू झाल्याने शहरातील पालवण चौक येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरी वस्तीत दारू दुकान असल्याने महिला, विद्यार्थीनी यांना त्रास होत आहे. याबाबत अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देऊनही याची दखल घेतली जात नाही. असे नारी विकास संघर्ष समितीच्या महिलांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Bottle in two villages in 42 years