शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी समितीनेच केले बूमरँग !

By admin | Updated: May 8, 2014 23:37 IST

जालना : घोटाळ्यासंदर्भात तत्कालीन बिडीओंविरुद्ध केलेल्या निलंबनाची शिफारस मागे घेत चौकशी समितीने आता कार्यालयीन चौकशीचा प्रस्ताव सादर केल्याने खळबळ उडाली आहे.

जालना : घनसावंगी तालुक्यातील मग्रारोहयो कामांमधील घोटाळ्यासंदर्भात तत्कालीन बिडीओंविरुद्ध केलेल्या निलंबनाची शिफारस मागे घेत चौकशी समितीने आता त्यांच्याविरुद्ध कार्यालयीन चौकशीचा प्रस्ताव सादर केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात परतूर, मंठ्यापाठोपाठ घनसावंगी व बदनापूर तालुक्यातील मग्रारोहयोचा घोटाळा चांगलाच गाजला. याबाबत जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या चौकशी समित्यांनी आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे दाखल केला. यात घनसावंगी तालुक्यातील गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन बीडीओंसह अन्य काही कर्मचार्‍यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविण्यात आले. एवढेच नव्हे तर बीडीओंच्या निलंबनाची शिफारस देखील करण्यात आली. चौकशी समितीचे प्रमुख तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे यांनी सभागृहात सदस्यांसमोरच ही माहिती दिली होती. जिल्हा परिषदेत चौकशी समितीच्या अहवालावर प्रत्यक्ष कारवाई करताना मात्र प्रशासनाकडून एकीकडे संथपणे कार्यवाही होत आहे. बदनापूर तालुक्यातील चित्तोडा येथील गैरव्यवहार प्रकरणाची फेरचौकशी लावण्यात आली. त्याचेही अद्याप काय झाले, हे सांगण्यास प्रशासनातील अधिकारी तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर घनसावंगीच्या तत्कालीन बीडीओंविरुद्ध निलंबन कारवाई ऐवजी कार्यालयीन चौकशी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आवारात चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेत अधिकार्‍यांना अभय मग्रारोहयो घोटाळ्यासंदर्भात चौकशी समित्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा परिषदेत संबंधितांवर प्रत्यक्ष कारवाई होण्याऐवजी त्यांना अभय देण्याचा प्रकार होत आहे. परतूर, मंठा तालुक्यातील गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी पूर्ण केली होती. तेथील गटविकास अधिकार्‍यांवर आयुक्तांनी निलंबन कारवाई केली. मात्र घनसावंगी व बदनापूर तालुक्यातील गैरव्यवहार प्रकरणी अधिकार्‍यांवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही, हे विशेष!