काळ्या बाजारातील धान्य गेवराईत पकडले

By Admin | Updated: May 21, 2014 00:14 IST2014-05-20T23:43:10+5:302014-05-21T00:14:12+5:30

गेवराई : माजलगाव येथून गेवराई शहरात काळ्याबाजारात विक्रीसाठी आलेला रेशनचा माल पोलीसांनी जप्त केला.

Black market caught grains in gaverny | काळ्या बाजारातील धान्य गेवराईत पकडले

काळ्या बाजारातील धान्य गेवराईत पकडले

 गेवराई : माजलगाव येथून गेवराई शहरात काळ्याबाजारात विक्रीसाठी आलेला रेशनचा माल पोलीसांनी जप्त केला. दरोडा प्रतिबंधक पथकाच्या पोलीसांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता ही कारवाई केली. शेख युसूफ शेख नसूब (रा. पात्रूड ता. माजलगाव) याला ताब्यात घेतले आहे. त्याचा एक साथीदार फरार आहे. टेम्पो क्र. एम.एच.१२ - ५७८९ मधून त्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यावरून दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख भारत राऊत यांनी सापळा लावला. त्याच्याकडून ४६ क्विंटल गहू जप्त करण्यात आला. टेम्पोसह धान्य असा २ लाख ४४ हजारांचा माल जप्त करण्यात आला. गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.हे.कॉ. संजय खताळ, जयसिंग वाघ, बबन राठोड, विलास ठोंबरे, भागचंद ढेपे यांनी कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: Black market caught grains in gaverny