शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे विसरले शहराचे नामकरण; पत्रावर 'औरंगाबाद' उल्लेख

By विकास राऊत | Updated: March 2, 2023 16:13 IST

प्रदेशाध्यक्षच शहराचे बदललेले नाव विसरल्याने पक्षात कुजबूज सुरू झाली;त्यानंतर तातडीने बदलले पत्र

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, देवळाली, देहू, शिवाजीनगर, पुणे येथील  छावणी परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी निवडणुक प्रमुख पदासाठी भाजपने काही पदाधिकार्यांनी जबाबदारी देत त्यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली. त्या नियुक्ती पत्रात छत्रपती संभाजीनगर ऐवजी शहराचे नाव औरंगाबाद असे मुद्रीत होऊन आल्यामुळे गुरूवारी एकच गदारोळ उडाला. 

प्रदेशाध्यक्षच शहराचे बदललेले नाव विसरल्याने पक्षात कुजबूज सुरू झाली. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांच्या लक्षात येताच, त्यांनी प्रदेश कार्यालयाकडून नियुक्तीपत्र बदलण्यासाठी फोनाफोनी सुरू केली. दुपारपर्यंत दुसरे नियुक्तीपत्र भाजप प्रदेश कार्यालयाकडून आल्याचे भाजप सुत्रांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. दरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियातील हँडलवर नवीन पत्र व्हायरल केले. 

यांच्यावर दिली आहे जबाबदारी...
पुणे छावणी परिषदेसाठी आ.सुनील कांबळे, शिवाजीनगर आ.सिध्दार्थ शिरोळे, देहू संजय भेगडे, देवळाली बाळासाहेब सानप, अहमदनगर महेंद्र गंधे,  छत्रपती संभाजीनगर संजय केणेकर, नागपूर डॉ.राजीव पोतदार यांच्यावर राज्यातील छावणी परिषदेच्या निवडणुक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद